शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ घोषित करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा

By admin | Updated: January 13, 2016 01:22 IST

अपुऱ्या पावसाने तसेच विविध रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांच्या धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

गुंजेवाही : अपुऱ्या पावसाने तसेच विविध रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांच्या धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. निसर्गाच्या प्रकोपाने शेतकऱ्यांच्या उभ्या धान पिकाचे नुकसान झाले. शासनाने सिंदेवाही तालुका दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी माजी उपसभापती विरेंद्र किशोर जयस्वाल यांनी केले आहे.तालुक्यात मागील वर्षी पेक्षा कमी प्रमाणात पाऊस पडला. शेतकऱ्यांनी पीक कर्ज, सावकारी कर्ज, उसनवार रक्कम घेवून धानाची लागवड केली. अपुऱ्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन पडीत राहिली. निसर्गावर अवलंबून असणाऱ्या धान पिकांचे पाण्याअभावी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच विविध रोगांच्या प्रादुर्भावाने धानपीक नेस्तनाबूत झाले. शेतकऱ्यांच्या तोंडाजवळ आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी संकटात आहे. आर्थिक संकटामुळे घेतलेले कर्ज कसे फेडायचे, या विचारात शेतकरी सापडला आहे. धान खरेदी केंद्र सर्व ठिकाणी सुरु न झाल्यामुळे खासगी व्यापारीही शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. शासनाकडून शेतकरी विरोधी धोरण राबविले जात आहे. धानपीक परवडत नसल्याने तसेच अनेकांनी लागवड केलेल्या धानाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात आहे. शेतकऱ्याच्या हितासाठी योग्य ते पाऊल उचलून सिंदेवाही तालुका दुष्काग्रस्त घोषित करण्याची मागणी माजी उपसभापती विरेंद्र किशोर जयस्वाल यांनी केली आहे. याची शासनाने दखल घ्यावी. (वार्ताहर)