शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

घुग्घुसची बाजारपेठ कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 05:00 IST

रविवारी सर्व व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठाने बंद ठेवली. कधी नव्हे ते रविवारी घुग्घुसचे रस्ते निर्मनुष्य दिसून आले. दरम्यान, वेकोलिच्या इंदिरानगर व रामनगर वसाहतीमधील बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची सोमवारपासून तपासणी सुरू करण्यात येणार आहे,अशी माहिती येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. वाकदकर यांनी लोकमतला दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : वेकोलिच्या कामगार वसाहतील दोन वेगवेगळ्या कामगार नगरामध्ये तीन कोरोनाबाधित आढळून आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. सरपंचांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून घुग्घुस येथील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रविवारी व्यापारपेठ कडकडीत बंद होती. रस्ते निर्मुनष्य झाले होते.वेकोलिच्या इंदिरानगर व रामनगर कामगार वसाहतीमधील तीन जण बाधित निघाल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, चंद्रपूरचे तहसीलदार निलेश गौंड, वेकोलि सबएरीया मॅनेजर पिसा रेड्डी, भाजपा जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे, शहर अध्यक्ष विवेक बोढे, प्रभारी सरपंच नुने, ग्रामविकास अधिकारी चंद्रहास नागदेवते, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जयस्वाल, तलाठी दिलीप पिल्लई व मंडल अधिकारी नवले यांनी वेकोलिच्या दोन्ही वसाहतीमध्ये येऊन सर्वेक्षण केले. इंदिरानगर वसाहतीतील ५८ क्वार्टर व रामनगर येथील आठ क्वार्टर सील करण्याचे निर्देश तहसीलदार गौंड यांनी दिले.सरपंच संतोष नुने व माजी जि.प.अध्यक्षांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी घुग्घुस व कॉलरी परिसरातील सर्व दुकाने दोन दिवस बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रविवारी सर्व व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठाने बंद ठेवली. कधी नव्हे ते रविवारी घुग्घुसचे रस्ते निर्मनुष्य दिसून आले. दरम्यान, वेकोलिच्या इंदिरानगर व रामनगर वसाहतीमधील बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची सोमवारपासून तपासणी सुरू करण्यात येणार आहे,अशी माहिती येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. वाकदकर यांनी लोकमतला दिली. या बंदमुळे नागरिकांच्या मनातही भीतीचे वातावरण पसरले असून नागरिक रविवारी घराबाहेर पडलेच नाही. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार