शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संपल्याच्या मानसिकतेतून बाहेर निघावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 05:00 IST

जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण सध्या कमी आहे. त्यामुळे कोविड-१९ पूर्णपणे संपला या मानसिकतेतून सर्वांनी बाहेर येण्याची गरज आहे. सतत मास्क परिधान करणे, वारंवार हात धुणे आणि सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा वापर केला तरच कोविडपासून आपण सुरक्षित राहू शकू, असेही जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सांगितले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : जि. प. सीईओ, पोलीस अधीक्षकांनी घेतली कोरोना लस

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर :  कोरोना फ्रंटलाईन वर्कर म्हणून शनिवारी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर आदींनी शनिवारी शासकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस घेतली. ही लस पूर्णत: सुरक्षित आहे, लस घेतल्यामुळे जिल्ह्यात आतापर्यत कुणालाही गंभीर रिॲक्शन झाले नाही. नोंदणीकृत फ्रंटलाईन वर्करने अफवांना बळी न पडता लस घ्यावी व कोरोना संपला, या मानसिकतेतून नागरिकांनीही बाहेर निघावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण सध्या कमी आहे. त्यामुळे कोविड-१९ पूर्णपणे संपला या मानसिकतेतून सर्वांनी बाहेर येण्याची गरज आहे. सतत मास्क परिधान करणे, वारंवार हात धुणे आणि सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा वापर केला तरच कोविडपासून आपण सुरक्षित राहू शकू, असेही जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सांगितले. कोविड व्हॅक्सिनचा पहिला डोज घेतला, काहीही त्रास झाला नाही, नियमांचे पालन केल्यास कोरोनावर मात करणे शक्य आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दिली.जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले म्हणाले, लस देणारे आरोग्य सेवक प्रशिक्षित असल्याने कुठलाही त्रास झाला नाही. २८ दिवसांनी लसीकरणाचा दुसरा डोज दिला जाईल. त्यापुढे १४ दिवसानंतर कोरोनाच्या ॲन्टिबॉडीज शरीरात तयार होतील. ज्यांची नावे लसीकरण मोहिमेत समाविष्ट  आहेत, त्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी लस टोचून घ्यावी. अपर जिल्हाधिकारी वरखेडकर म्हणाल्या, लस अतिशय सुरक्षित आहे. मास्कचा वापर, हात धुणे व अंतर राखणे ही त्रिसूत्री पाळूनच आपण कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकू शकतो. यावेळी उपजिल्हाधिकारी जनार्दन लोंढे, तहसीलदार यशवंत धाईत, जिल्हाधिकारी कार्यालय व इतर कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी लस घेतली. आरोग्य सेविका चंदा डहाके या प्रशिक्षित आरोग्य सेविकेने सर्वांना लस दिली. यावेळी अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे, डॉ. राजेंद्र सुरपाम, लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम आदी उपस्थित होते. 

लसीकरणासाठी ७ हजार ७५५ जणांची नोंदणी जिल्ह्यातील ७ हजार ७५५ फ्रंटलाईन वर्कर्सची लसीकरणासाठी नोंदणी झाली. शुक्रवारपर्यंत ३ हजार ५९  जणांना लस देण्यात आली. यापूर्वी १२ हजार ९१ आरोग्य सेवकांना कोरोना लस देण्यात आली होती.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या