शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधितेच्या मृतदेहावर मनपाकडून अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:01 IST

महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी अंत्यसंस्काराची तयारी मनपाला करावी लागणार, याची पूर्वकल्पना अधिकारी, कर्मचाऱ्यांना सकाळीच दिली होती. अंत्यसंस्काराची रंगीत तालीम यापूर्वी मनपाद्वारे करण्यात आली होती. त्यानुसार तयारी सुरु करण्यात आली. अंत्यसंस्कारासाठी कुणीही नातेवाईक समोर न आल्याने शेवटी महानगरपालिकेने पुढाकार घेऊन अंत्यसंस्काराचा विधी पार पाडला.

ठळक मुद्देनातेवाईकांनी फिरविली पाठ : तेलंगणातून आलेल्या महिलेचा कोरोनाने मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : तेलंगणा राज्यातून २१ जुलै रोजी एक महिला चंद्रपूर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. पॉझिटिव्ह स्वॅब आलेल्या या महिलेचा शर्थीच्या वैद्यकीय उपचारानंतर शुक्रवारी पहाटे २.३० वाजता मृत्यू झाला. मात्र अंत्यसंस्कारासाठी मृतक महिलेचे कोणतेही नातेवाईक आले नाही. त्यामुळे अखेर कोरोनाबाधितेच्या मृतदेहांवर महानगरपालिकेकडून अत्यंस्कार करण्याचा निर्णय मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी घेतला. आणि मनपा कर्मचाऱ्यांनी महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केला.महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी अंत्यसंस्काराची तयारी मनपाला करावी लागणार, याची पूर्वकल्पना अधिकारी, कर्मचाऱ्यांना सकाळीच दिली होती. अंत्यसंस्काराची रंगीत तालीम यापूर्वी मनपाद्वारे करण्यात आली होती. त्यानुसार तयारी सुरु करण्यात आली. अंत्यसंस्कारासाठी कुणीही नातेवाईक समोर न आल्याने शेवटी महानगरपालिकेने पुढाकार घेऊन अंत्यसंस्काराचा विधी पार पाडला. यावेळी स्वत: आयुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, सचिन पाटील व स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते. कोरोनाचे जगभरात थैमान सुरु असताना मार्चच्या पहिल्या आठवड्यात या विषाणूचा राज्यात शिरकाव झाला. तेव्हापासून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लॉकडाऊन करण्यात आले. यानंतर महानगरपालिका प्रशासनाने कोरोनाचा प्रतिबंध करण्यास कसोशीने प्रयत्न सुरु केले. रुग्ण तत्काळ सापडण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली. तातडीने वैद्यकीय उपचार मिळावा याचे नियोजन करण्यात आले. सदर महिला ही तेलंगणा राज्यातून २१ जुलै रोजी चंद्रपूर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. २१ जुलै रोजी दाखल केलेल्या या महिलेला श्वसनाचा त्रास होता. तसेच ही महिला उच्च रक्तदाबाचीदेखील रुग्ण होती. २३ जुलै रोजी ही महिला पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले. रात्रीच या महिलेला वैद्यकीय महाविद्यालयात गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले. त्यांच्यावर शर्थीचे वैद्यकीय उपचार करण्यात आले. मात्र शुक्रवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. या महिलेच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांनी पुढे येणे गरजेचे होते. मात्र सर्व नातेवाईकांनी पाठ फिरविली. अखेर मनपा कर्मचाºयांनीच तिच्या पार्थिवावर पठाणपुरा गेटबाहेर तयार करण्यात आलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केला.प्रारंभी नागरिकांचा विरोधमृतक महिलेच्या पार्थिवावर पठाणपुरा गेटबाहेरील नव्याने तयार केलेल्या स्मशानभूमीत मनपाद्वारे अंत्यसंस्कार होत असल्याची माहिती त्या परिसरात नागरिकांना झाली. त्यामुळे त्यांनी महानगरपालिकेत जाऊन मृतक महिलेवर या ठिकाणी अंत्यसंस्कार करू नये, अशी मागणी केली. मात्र मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी नागरिकांची समजूत काढत, अंत्यसंस्काराने कोणालाही कुठलीही बाधा होणार नाही, हे समजावून सांगितले. त्यानंतर नागरिकांचे समाधान झाले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या