शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

नव्या सीईओसमोर सभापतींनीच वाचला प्रलंबित समस्यांचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 05:00 IST

जि. प. स्थायी समितीची सभा मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरूनुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नव्यानेच रूजू झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी, सर्व सभापती व विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. कोरोनामुळे प्रत्यक्षात सभा घेण्यास राज्य शासनाकडून प्रतिबंध होता. मात्र, परवानगी मिळाल्याने पहिल्याच सभेत सभापतींसह उपस्थित सदस्यांनी विविध प्रश्नांची सरबत्ती करून प्रलंबित समस्यांकडे लक्ष वेधले.

ठळक मुद्दे‘त्या’ मुख्याध्यापकासह केंद्रप्रमुख व बीईओवर कारवाई होणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषदेत वारंवार समस्या मांडूनही निपटारा होत नाही, असा आक्षेप नोंदवून खुद्द सभापतींनीच नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचल्याने मंगळवारी पार पडलेली स्थायी समितीची सभा जि. प. च्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. दरम्यान, सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथे जि. प. शाळेत विनापरवानगीने आठवा वर्ग सुरू करणाऱ्या मुख्याध्यापकासह केंद्रप्रमुख व गटशिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश सीईओ सेठी यांनी दिले.जि. प. स्थायी समितीची सभा मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरूनुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नव्यानेच रूजू झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी, सर्व सभापती व विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. कोरोनामुळे प्रत्यक्षात सभा घेण्यास राज्य शासनाकडून प्रतिबंध होता. मात्र, परवानगी मिळाल्याने पहिल्याच सभेत सभापतींसह उपस्थित सदस्यांनी विविध प्रश्नांची सरबत्ती करून प्रलंबित समस्यांकडे लक्ष वेधले.  नवरगाव येथील भाड्याने दिलेल्या जि. प. शाळेचाही विषय चर्चेत आला. 

घरकूलसाठी लाच मागल्याचा विषय ऐरणीवरब्रह्मपुरीत घरकुल लाभासाठी ५ हजार रुपए मागितले जात असल्याचाही विषयही सभेत आला. अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीवरून सदस्य आक्रमक झाले होते.

अध्यक्ष व सभापतींमध्ये कलगीतुरा- सभापतींनीच विविध समस्यांचा पाढा वाचण्यास सुरूवात करताच अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी आपल्या कक्षात हे विषय सोडविता येऊ शकतात, या शब्दात सभापतींना आश्वास्त केले. मात्र, सभापतींची खुर्ची आणि कक्षातही हे प्रश्न सुटत नसल्याने सभेत मांडावे लागत असल्याची उघड नाराजी तीन सभापतींनी व्यक्त केल्याची चर्चा आहे.

अभियंत्या नियुक्तीत घोळ- बांधकाम विभागातील २८ सहाय्यक कनिष्ठ अभियंत्यांचे प्रमोशन झाले आहे. त्यांच्या काही दिवसातच नियुक्त्या होणार आहेत. मात्र, आधी या विभागात प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकाऱ्यांना आपल्या आस्थापनेवर पाठवावे आणि त्यानंतरच अभियंत्यांची नियुक्ती करावी. मात्र, चुकीचे निर्णय घेऊन घोळ घालू नये, अशाही सूचना सदस्यांनी केल्या.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद