कर्मशाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेची जिल्हा कार्यकारिणी गठित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:34 IST2021-02-05T07:34:33+5:302021-02-05T07:34:33+5:30

शिक्षक भारती विशेष शाळा, कर्मशाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी चंद्रपूर जिल्हा सहविचार सभा चंद्रपूर येथे पार पडली. या सभेत ...

Formed District Executive Committee of Workshop Teachers and Non-Teaching Staff Association | कर्मशाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेची जिल्हा कार्यकारिणी गठित

कर्मशाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेची जिल्हा कार्यकारिणी गठित

शिक्षक भारती विशेष शाळा, कर्मशाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी चंद्रपूर जिल्हा सहविचार सभा चंद्रपूर येथे पार पडली. या सभेत चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात दिव्यांगांच्या अनेक विशेष शाळा, कर्मशाळा आहेत. या शाळेत कार्यरत असलेले शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या अनेक समस्या आहेत. या समस्यांना वाचा फोडण्याचे काम ही संघटना करणार आहे.

सभेच्या अध्यक्षस्थानी शिक्षक भारती नागपूर विभागीय सरचिटणीस सुरेश डांगे होते. प्रमुख अतिथी विभागीय उपाध्यक्ष रवींद्र उरकुडे, खासगी प्राथमिक शिक्षक भारतीचे राबिन करमरकर, जिल्हा संघटक विलास फलके उपस्थित होते. रामदास कामडी यांनी प्रास्ताविक केले. शिक्षक भारती विशेष शाळा कार्यकारिणीत जिल्हाध्यक्ष महेश भगत व सचिवपदी रामदास कामडी यांची नियुक्ती करण्यात आली. उपाध्यक्षपदी विजय भसारकर,कार्याध्यक्ष पद्माकर मोरे, कार्यालयीन सचिव कालिदास बलकी,कोषाध्यक्ष गिरीधर मसराम, सहसचिव सुहास देवडे,सहकोषाध्यक्ष प्रमोद सातपुते, सहकार्याध्यक्ष गिरीधर तागडे, प्रसिद्धीप्रमुख रविकांत घोलप यांची नियुक्ती करण्यात आली. सदस्य म्हणून विश्वनाथ बनकर,चंदा चंदेवार, सीमा बावणे, साधना माटे, प्रज्ञा नारनवरे, कैलाश कावळे,भूपेंद्र गरमडे यांचा समावेश आहे. सूत्रसंचालन गुलाब शेंडे ती गिरीधर तागडे यांनी आभार मानले.

Web Title: Formed District Executive Committee of Workshop Teachers and Non-Teaching Staff Association