शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

जंगलालगतच्या 471 गावांमध्ये संपणार वन विभागाची लुडबूड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 05:00 IST

पिढ्यानपिढ्या जंगलात वास्तव्याला असूनही त्यांच्या हक्कांची कोणत्याही प्रकारची नोंद नाही आणि अधिकारांनाही मान्यता नाही, अशा समूहातील वननिवासी अनुसूचित जमाती व पारंपारिक वननिवासींकरीता वनहक्क कायदा तयार करण्यात आला. कायदा तयार करताना ऐतिहासिक घोडचूक दुरूस्ती केल्या जात असल्याचेही सर्वोच्च न्यायालय व तत्कालिन केंद्र सरकारने नमुद केले होते.

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वन हक्क मान्यता) अधिनियम-२००६ अंतर्गत जिल्हा प्रशासनाने ४७१ गावांतील सामूहिक वनहक्क दावे नुकतेच मान्य केले. या गावांना आता जल, जंगल व जमिनीचा अधिकार मिळाला आहे. ४ हजार १९५ वैयक्तिक दाव्यांनाही मंजुरी देण्यात आली असून जमीन मोजणीनंतर लवकरच सात-बारा प्रदान करण्यात येणार आहे.पिढ्यानपिढ्या जंगलात वास्तव्याला असूनही त्यांच्या हक्कांची कोणत्याही प्रकारची नोंद नाही आणि अधिकारांनाही मान्यता नाही, अशा समूहातील वननिवासी अनुसूचित जमाती व पारंपारिक वननिवासींकरीता वनहक्क कायदा तयार करण्यात आला. कायदा तयार करताना ऐतिहासिक घोडचूक दुरूस्ती केल्या जात असल्याचेही सर्वोच्च न्यायालय व तत्कालिन केंद्र सरकारने नमुद केले होते. जिल्ह्यात कायद्याच्या अंमलबजावणीकडे सुरूवातीपासून लक्ष दिल्याने प्रलंबित प्रकरणांची संख्या मोठी नाही. यापूर्वी जिल्हास्तरीय समितीने वनहक्क दावा नामंजूर केल्यास विभागीय समितीकडे अपीलाची संधी नव्हती. राज्यपालांच्या अधिसूचनेमुळे अपील करण्याचा अधिकार मिळाला.   वन हक्काच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी प्रयत्नरत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

२५८ वनहक्क दाव्यांची जमीन मोजणी- नियम व अटींचे पालन करून प्रशासनाने ४७१ सामूहिक आणि ४ हजार १९५ वैयक्तिक दावे मंजूर केले. ३ हजार ९३७ दाव्यांतील जमीन मोजणी करून सातबारा वाटप केले तर २५८ दाव्यांच्या वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

जिवती तालुक्यात सर्वाधिक १,३१४ वैयक्तिक दावेजिवती तालुक्यात सर्वाधिक १,३१४ वैयक्तिक दावे तर नागभीड ४३७, कोरपना ३३९, चिमूर ३१४, गोंडपिपरी १९३, पोंभुर्णा १६५, भद्रावती १३२, ब्रह्मपुरी २०७ व सिंदेवाही तालुक्यातही १९४ दावे मंजूर झाले आहेत.

१५ ऑगस्टला देणार वनहक्क क्षेत्रातील जमिनीचा सात-बारा निस्तार हक्क, गौण वनौपज, सामूहिक वन सरंक्षण, संवर्धन व व्यवस्थापन, जैवविविधता, बौद्धीक संपत्ती व पारंपरिक ज्ञान संवर्धनाचा अधिकार गावांना मिळाला आहे. गावांच्या वाट्यातील जंगल व जमिनीत वन विभाग व अन्य विभागांना यापुढे हस्तक्षेप करता येणार नाही. रविवारी १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी प्रातिनिधिक स्वरूपात २७ नागरिकांना पालकमंत्री विजय वडेट्टीवार जमिनीचा सात-बारा प्रदान करणार आहेत.

 

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभाग