शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

शेतीचा पहिला दिवसच कर्दनकाळ

By admin | Updated: June 14, 2015 01:55 IST

कोरपना तालुक्यातील वडगाव येथे वीज पडून सहा जणांचा आकस्मिक मृत्यू झाला.

मदतही नाही : पितृछत्र हरपलेल्या अंकुशवर आई-बहिणींची जबाबदारीरत्नाकर चटप  नांदाफाटाकोरपना तालुक्यातील वडगाव येथे वीज पडून सहा जणांचा आकस्मिक मृत्यू झाला. यातील राजू गेडाम या मोलमजुरी करणाऱ्या शेतमजुरांच्या कुटुंबावर ओढविलेला जगण्यासाठीचा संघर्ष मन हेलावून टाकणारा आहे.मृत राजूला दोन पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबाचा संपुर्ण भार बारावीत असलेल्या अंकुशवर पडला आहे. पंधरा वर्षापूर्वी राजुरा तालुक्यातील मंगी या गावावरून हे कुटुंब कामासाठी वडगाव येथे स्थलांतरित झाले. मृत राजुला ट्रॅक्टर चालविण्याचे व शेती कामाचे चांगले कौशल्य असल्याने वडगावात त्याला काम मिळू लागले. या खरीप हंगामात त्याचा शेतात जाण्याचा हा पहिलाच दिवस होतो. ज्या दिवशी आकाशात अचानक ढग गोळा होऊन वीज चमकू लागली वीज कोसळून तो जागी ठार झाला. पहिला पाऊस, पहिला शेतातील दिवस त्याच्यासाठी व कुटुंबास कर्दनकाळ ठरला आहे. अंकुशच्या शिक्षणासह इयत्ता पाचवीमध्ये शिकणारी बहिण रिना व इयत्ता सातवीत शिकणाऱ्या कविताचा भार त्याला पेलावा लागणार आहे. राजू गेडाम यांचे नाव बीपीएल यादीत आहे.परंतु अद्याप त्यांना घरकुल मिळालेले नाही. गावातील नविन वस्तीतील जागेवर लाकूड फाटे, बांबुचे ताखे आणि कवेलू, पत्रे टाकून कुटुंब राहत आहे. येणाऱ्या दिवाळीला घरावर छत टाकून राहण्यापुरते घर तयार करण्याचे मृत राजूचे स्वप्न असल्याचे पत्नीने सांगितले. मात्र आता घरातील मुळ कर्णधार गेल्याने जगायचे कसे, असा प्रश्न घरच्यांसमोर निर्माण झाला आहे. घराचा संपुर्ण भार पेलावा लागणार असल्याने शिक्षणासाठी अंकुशला मोठी कसरत करावी लागणार आहे. मुळगावी वडिलांच्या नावे शेती नाही. कुठलाही बँक बॅलेन्स अथवा घराची जागा तेवढीच मालमत्ता असल्याचे अंकुशने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. हातावर आणून पानावर खाणाऱ्या या कुटुंबाचा आधारवड हिरावल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेतील इतर पाच मृतांची परिस्थिती अशीच आहे. एकाला लग्नाआधीच प्राण सोडावा लागला तर एकाचा चार महिन्यातच बाळ आणि पत्नीला सोडून असे जावे लागले.वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या या सहा जणांच्या घरातील चित्र मन हेलावणारे आहे. या घटनेनंतर स्थानिक आमदार, माजी आमदार, प्रशासकीय अधिकारी यांनी मृतांच्या कुटुंबियांना भेटी देऊन मदतीचे आश्वासन दिले आहे. मात्र अद्याप मदत नाही. तेव्हा शासन काय मदत करेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.