शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

अखेर १६ शिक्षकांच्या प्रतिनियुक्तीचा आदेश रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 05:01 IST

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन जिल्ह्यातच करण्याचा आदेश असताना २०१७-१८ च्या संचमान्यतेत अतिरिक्त झालेल्या ३५ शिक्षकांचे समायोजन विभागीय स्तरावर करण्यात आले. या अन्यायाविरूद्ध विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी सभा बोलावून तीव्र विरोध करण्याचा ठराव संघटनेच्या बैठकीत घेतला. शिक्षण उपसंचालकांद्वारे राबविलेल्या अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रियेला स्थगिती देण्यासाठी महामंडळ उपाध्यक्ष आंनदराव कारेमोरे यांच्या नेतृत्वात आंदोलनही झाले.

ठळक मुद्देशिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने दर्शविला होता तीव्र विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त ३५ शिक्षकांचे समायोजन जिवती तालुक्यातील विविध शाळेत प्रतिनियुक्तीवर करण्यात आले. परंतु समायोजन झालेल्या शिक्षकांचे वेतन मूळ शाळेतूनच काढल्या जात होते. वेतन काढण्यासाठी काही मुख्याध्यापकांचा विरोध होता. आरक्षणानुसार ३५ शिक्षकांपैकी १६ शिक्षक आरक्षणात बसत नव्हते. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या प्रयत्नांमुळे १६ शिक्षकांना परत मूळ आस्थापनेत आणण्याचा आदेश जि. प. शिक्षणाधिकाऱ्यांनी (प्राथमिक) यांनी दिला.अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन जिल्ह्यातच करण्याचा आदेश असताना २०१७-१८ च्या संचमान्यतेत अतिरिक्त झालेल्या ३५ शिक्षकांचे समायोजन विभागीय स्तरावर करण्यात आले. या अन्यायाविरूद्ध विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी सभा बोलावून तीव्र विरोध करण्याचा ठराव संघटनेच्या बैठकीत घेतला. शिक्षण उपसंचालकांद्वारे राबविलेल्या अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रियेला स्थगिती देण्यासाठी महामंडळ उपाध्यक्ष आंनदराव कारेमोरे यांच्या नेतृत्वात आंदोलनही झाले. परिणामी विभागीय समायोजन प्रक्रियेला स्थगिती मिळाली. विमाशि संघाचे जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे, सुरेंद्र अडबोले आदींनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार या समस्येकडे लक्ष वेधले. सरकार्यवाह सुधाकर अडबाले, जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण धोबे, कोषाध्यक्ष दिगांबर कुरेकर, उपाध्यक्ष सुनिल शेरकी, मनोज वासाडे, प्रभाकर पारखी, प्रा. ज्ञानेश्वर सोनकुसरे, दीपक धोपटे, सुरेंद्र अडबाले, भालचंद्र्र धांडे आदींनी जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला. आरक्षणात न बसणाऱ्या शिक्षकांना त्याच ठिकाणी ठेवल्यास मोठे नुकसान होऊ शकते, हे पटवून दिले. त्यामुळे मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी चर्चा केल्यानंतर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दीपेंद्र लोखंडे यांनी प्रतिनियुक्तीचा आदेश रद्द करून १६ शिक्षकांचे समायोजन करण्यात काही हरकत नसल्याचा आदेश १४ ऑगस्ट २०२० रोजी जारी केला आहे.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाTeacherशिक्षक