पावसाअभावी रोवण्या खोळंबल्याने शेतकरी चिंतातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 05:00 AM2020-07-11T05:00:00+5:302020-07-11T05:00:20+5:30

तालुक्याचे एकूण लागवड क्षेत्र ४६ हजार ३९४. ९८ हेक्टर आहे. यापैकी २६ हजार २९९. १४ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येते. यात धानाचे पीक सर्वाधिक २२ हजार ७८८ हेक्टर,कापूस एक हजार ३२४ हेक्टर, सोयाबीन ६.९० हेक्टर, भाजीपाला ५१.४० हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली आहे. यावर्षी आतापर्यंत ३८२. ६ मिमि पाऊस पडला. त्यामुळे सिंचन व्यवस्था नसलेल्या शेतकऱ्यांना पावसाची वाट बघावी लागत आहे.

Farmers worried due to lack of rains | पावसाअभावी रोवण्या खोळंबल्याने शेतकरी चिंतातूर

पावसाअभावी रोवण्या खोळंबल्याने शेतकरी चिंतातूर

googlenewsNext
ठळक मुद्देदमदार पावसाची प्रतीक्षा : ३८२. ६ मिमी पावसाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : तालुक्यात रोवणी करण्यासाठी पुरेसे पाऊस न पडल्याने शेकडो शेतकऱ्यांची कामे ठप्प झाली आहेत. दमदार पाऊस पडला नाही तर रोवण्या पूर्ण होण्यास विलंब लागणार आहे.
तालुक्याचे एकूण लागवड क्षेत्र ४६ हजार ३९४. ९८ हेक्टर आहे. यापैकी २६ हजार २९९. १४ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येते. यात धानाचे पीक सर्वाधिक २२ हजार ७८८ हेक्टर,कापूस एक हजार ३२४ हेक्टर, सोयाबीन ६.९० हेक्टर, भाजीपाला ५१.४० हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली आहे. यावर्षी आतापर्यंत ३८२. ६ मिमि पाऊस पडला. त्यामुळे सिंचन व्यवस्था नसलेल्या शेतकऱ्यांना पावसाची वाट बघावी लागत आहे. यावर्षी कापूस लागवडीत वाढ झाली. कापूस व सोयाबीन पीक सध्या चांगले आहे. भाजीपाला लागवडीकडे शेतकºयांचा कल वाढला. भाजीपाला हे नगदी पीक असल्याने शेतकरी खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात लागवड करीत आहेत. यंदा समाधानकारक पाऊस आल्यास भात पिकासह कापूस, सोयाबीन, भाजीपाल्याचे उत्पादन चांगले होण्याची आशा आहे. मात्र, सध्या तरी शेतकरी चिंतेत आहेत.

पावसाला सुरुवात झाली. मात्र, रोवणीसाठी पुरेसे पाऊस आला नाही. निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी रोवणीला सुरूवात केली नाही. कृषिपंप व सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी रोवणी करीत आहेत. कृषी पथक शेतकऱ्यांच्या बांध्यावर जावून पाहणी करीत आहे. पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव नये, यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.
- प्रशांत कचराळे, तालुका कृषी अधिकारी, मूल

Web Title: Farmers worried due to lack of rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.