शेतकऱ्यांचा वन अधिकाऱ्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 05:00 AM2020-07-05T05:00:00+5:302020-07-05T05:00:48+5:30

येथील मामा तलाव परिसरात वाघाच्या हल्ल्यात माधव पेंदाम व चक्रधर खटू निकुरे या शेतकºयांच्या दोन शेळ्या ठार झाल्याची घटना गुरूवारी घडली. या परिसरात वाघाचा संचार सुरू असल्याने शेतीची कामे रखडली आहेत. वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Farmers surround forest officials | शेतकऱ्यांचा वन अधिकाऱ्यांना घेराव

शेतकऱ्यांचा वन अधिकाऱ्यांना घेराव

Next
ठळक मुद्देकवळपेठ परिसरात वाघाची दहशत । तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
भेजगाव : वनपरिक्षेत्र अंतर्गत चिचाळा कवळपेठ गट ग्रामपंचायत परिसरातील गावांमध्ये काही दिवसांपासून वाघाची दहशत सुरू आहे. वाघाने हल्ला केल्याने आठ दिवसात दोन जनावरे ठार तर एक व्यक्ती जखमी झाला. त्यामुळे वाघाचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी शेतकºयांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना शुक्रवारी घेराव घातला.
चिचाळा व कवळपेठ येथील शेतकरी शेतीची कामे करीत आहेत. काही दिवसात रोवणीलाही सुरूवात होईल. शेतकºयांची शेती जंगलाला लागून आहे. मात्र, परिसरात वाघाचा संचार सुरू असल्याने शेतीची कामे अडचणी आल्याने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रा. पं. सदस्य प्रशांत गट्टुवार यांच्या नेतृत्वात नागेश टिकले, संजय धोडरे, वासुदेव बरांडे, सुभाष वाढई आदींनी चिचपल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजुरकर यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

शेतीभोवती तारांचे कुंपण घालणार
चिचाळा-कवळपेठ परिसरातील शेतकऱ्यांनी दिलेले निवेदन प्राप्त झाले. या भागातील ज्या शेतकऱ्यांची शेती जंगलाला लागून आहे. त्या शेती भोवताल तारा अथवा जाळीचे कुंपण लावण्याबाबत वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी राजुरकर यांनी ‘लोकमत‘ला दिली.
तलावात परिसरात दोन शेळ्या ठार
सावरगाव : येथील मामा तलाव परिसरात वाघाच्या हल्ल्यात माधव पेंदाम व चक्रधर खटू निकुरे या शेतकºयांच्या दोन शेळ्या ठार झाल्याची घटना गुरूवारी घडली. या परिसरात वाघाचा संचार सुरू असल्याने शेतीची कामे रखडली आहेत. वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

वाघाच्या हल्ल्यात गाय ठार
मासळ : वाघाच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याची घटना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या चैती रिठ (टेकाडी मांडवझरी) संरक्षित वनपरिक्षेत्र परिसरात मंगळवारी दुपारी घडली. कोलारा येथील शेतकरी आनंदराव नन्नावरे हे गुरूवारी सकाळी ८ वाजता शेताकडे जात असताना वाघाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु समयसुचकतेने शेतकरी बचावले. कोलारा येथील गुराखी वसंता ढोणे हे ताडोबा लगतच्या जगंलालगत गुरे चारण्यासाठी गेले होते. वाघाने गुरांच्या कळपावर केल्याने गाय ठार झाली. शंकर ढोणे व वसंता जांभूळे यांनी आरडाओरडा केल्याने वाघ पळाला. घटनेची माहिती कोलारा कोअर झोनचे वनपरिक्षेत्र अधिकारी चव्हाण यांना दिल्यानंतर पंचनामा केला. सातारा येथील अक्षय माळवे यांना भरपाई देण्याची मागणी गावातील शेतकऱ्यांनी वनविभागाकडे निवेदनातून केली आहे.

Web Title: Farmers surround forest officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.