शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

अतिशय कष्टाने दारू बंदी झाली - पारोमिता गोस्वामी

By admin | Updated: June 13, 2015 01:32 IST

मागील ४० वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारू सुरू होती. दारूबंदीसाठी महिलांनी पुढे येऊन अनेक आंदोलने केली.

वरोरा : मागील ४० वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारू सुरू होती. दारूबंदीसाठी महिलांनी पुढे येऊन अनेक आंदोलने केली. तुरुंगवास भोगला. अतिशय कष्टातून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली आहे. ही दारूबंदी टिकविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष तथा दारूबंदी आंदोलनाच्या संयोजिका पारोमिता गोस्वामी यांनी केले. वरोरा येथील महात्मा गांधी चौकात गुरूवारी आयोजित सभेत त्या बोलत होत्या. अ‍ॅड.पारोमिता गोस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत डॉ.रजनी हजारे, अश्रफभाई मिस्त्री, सेवकराम मिलमिले, योगिता लांडगे, आबिद अली उपस्थित होते. सुरुवातीला जिल्ह्यात १०० दारूचे परवाने होते. ते २०१५ पर्यंत ६०० झाले आणि गावागावांत देशी-विदेशी, बियर शॉपी, वाईन बार उघडले गेले. दारूबंदी व्हावी, यासाठी महिलांचा संघर्ष सुरू होता. चिमूर ते नागपूर पदयात्रा काढण्यासोबतच वरोरा शहरातील महात्मा गांधी चौकात महिलांनी दारूबंदीसाठी मुंडण केले. अशा अनेक आंदोलनानंतर चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली. वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार बाळू धानोरकर यांनी जिल्ह्यात दारूबंदी फसवी ठरली असल्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. जेमतेम दोन महिने झाले आहे. धानोरकर हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. त्यांनी असे वक्तव्य करणे योग्य नाही, अशा परखड शब्दात अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी त्यांचा समाचार घेतला. स्वत:च्या पक्षातील आमदारांचा विरोध झुगारून ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आम्हाला दिलेला शब्द पाळत दारूबंदी करून दाखविली. याबाबत ना. मुनगंटीवार यांची अ‍ॅड.पारोमिता गोस्वामी यांनी प्रशंसा केली. दारूबंदसाठी महिलांनी व समाजातील प्रत्येक घटकाने प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. (तालुका प्रतिनिधी)