शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांची रिसोर्स बँक देणार जादा उत्पादनाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 05:00 IST

पुरस्कार प्राप्त शेतकरी हे आपल्या शेतात नावीण्यपूर्ण प्रयोग करून त्यातून तावून-सुलाखून तयार झालेले असतात. त्यामुळे त्यांच्या प्रयोगाचा आणि अनुभवाचा फायदा अन्य शेतकऱ्यांना व्हावा यासाठी कृषी विभागाने हे पाऊल उचलले आहे. निवडलेल्या पुरस्कारप्राप्त व नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शेतकऱ्यांना आता कृषी विद्यापीठे व तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यांच्याकडून शेतकऱ्यांना हवा तेव्हा कृषी सल्ला मिळण्याची सोय होणार आहे.

ठळक मुद्देनाविण्यपूर्ण उपक्रम : जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पारंपरिक शेतीला टाळून जास्त उत्पन्न घेणारे आणि सतत नाविण्याचा विचार करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्यांना शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून आदर्श शेतकरी म्हणून पुरस्कार प्रदान केला जातो. या प्रगतीशील शेतकऱ्यांकडे इतरांना दिशा देणारे बरेच काही अनुभव गाठीशी असतात. अशा शेतकऱ्यांची रिर्सार्स बँक तयार केले जाणार आहे. या बँकेत जिल्ह्यातील प्रगतीशील पुरस्कारप्राप्त शेतकरीही सहभागी होणार आहेत.पुरस्कार प्राप्त शेतकरी हे आपल्या शेतात नावीण्यपूर्ण प्रयोग करून त्यातून तावून-सुलाखून तयार झालेले असतात. त्यामुळे त्यांच्या प्रयोगाचा आणि अनुभवाचा फायदा अन्य शेतकऱ्यांना व्हावा यासाठी कृषी विभागाने हे पाऊल उचलले आहे. निवडलेल्या पुरस्कारप्राप्त व नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शेतकऱ्यांना आता कृषी विद्यापीठे व तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यांच्याकडून शेतकऱ्यांना हवा तेव्हा कृषी सल्ला मिळण्याची सोय होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता कोणत्या हंगामात कोणती पिके घेता येतील, ते घेताना कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे, त्याला कोणती खते, किटकनाशके द्यावी, त्याचे मार्केट कसे असेल, अशा प्रश्नांची उत्तरे त्यांच्या गावाजवळच मिळण्याची सोय उपलब्ध होणार आहे.पिकांबद्दल शेतकऱ्यांना मिळणार तातडीने सल्लानिसर्गच्या अवकृपेमुळे शेतकरी संकटात सापडतात. त्यामुळे शेतात कोणती पिके घ्यावी, खते, कीटकनाशके द्यावी, त्याचे मार्केट कसे असेल? अशा प्रश्नांची उत्तरे त्यांना त्यांच्या गावाजवळच मिळावी यासाठी कृषी विभागाने पुरस्कार प्राप्त व नावीण्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शेतकऱ्यांची ह्यरिसोर्स बँकह्ण ची स्थापना झाली. त्याद्वारे गरजु शेतकऱ्यांना तातडीने सल्ला मिळणार आहे.नवीन तंत्रज्ञानाची माहितीशेतकऱ्यांना नव्याने उमेदीने पिके घेण्यासाठी कृषी सल्ल्याची गरज असते. अशावेळी कृषी विद्यापीठातील तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहचवण्यासाठी कृषी विभागामार्फत विविध उपक्रमाद्वारे प्रयत्न केले जातात. मात्र तरीही शेतकऱ्यापर्यंत आवश्यक माहिती पोहचण्यासाठी मर्यादा येतात. याद्वारे नवीन तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे, असा दावा कृषी विभागाकडून केला आहे.

टॅग्स :bankबँकFarmerशेतकरी