शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गांजापाठोपाठ चंद्रपुरात ब्राऊन शुगरची एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 05:00 IST

आरोपीकडून ४९ ग्राम ब्राऊन शुगर व मोबाईल असा एकूण ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मागील काही दिवसांपासून पोलिसांच्या कारवाईत आम्ल पदार्थ आढळून येत असल्याने चंद्रपूर जिल्हा ‘’’’उडता पंजाब’’’’च्या वाटेवर तर नाही ना, असा प्रश्न निर्माण होत आहे. चंद्रपुरात जिल्ह्यात दारू बंद करण्यात आली. त्यामुळे अनेकांनी नशा करण्यासाठी विविध पदार्थाचा वापर सुरू केला. त्यामुळे जिल्ह्यात आम्ल पदार्थाची तस्करी वाढली.

ठळक मुद्देएकाला अटक : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूरातून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केल्याच्या घटनेला चार दिवस होण्याअगोदरच ब्राऊन शुगरची विक्री करणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रियदर्शिनी चौकातील मुख्य पोस्ट ऑफिसजवळून अटक केली. अजय श्याम दुपारे रा. फुले चौक बाबुपेठ चंद्रपूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून ४९ ग्राम ब्राऊन शुगर व मोबाईल असा एकूण ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मागील काही दिवसांपासून पोलिसांच्या कारवाईत आम्ल पदार्थ आढळून येत असल्याने चंद्रपूर जिल्हा ‘’’’उडता पंजाब’’’’च्या वाटेवर तर नाही ना, असा प्रश्न निर्माण होत आहे.चंद्रपुरात जिल्ह्यात दारू बंद करण्यात आली. त्यामुळे अनेकांनी नशा करण्यासाठी विविध पदार्थाचा वापर सुरू केला. त्यामुळे जिल्ह्यात आम्ल पदार्थाची तस्करी वाढली. यावर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विशेष मोहीम सुरू केली. चार दिवसांपूर्वी तेलगणावरून आणलेला गांजा जप्त करण्यात आला.गुरुवारी एक इसम प्रियदर्शिनी चौकातील मुख्य पोस्ट ऑफिसजवळ ब्राऊन शुगरची विक्री करणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून प्रियदर्शनी चौकात संशयित व्यक्तीची तपासणी केली यावेळी त्याच्याजवळ ४९ हजार रुपये किंमतीचा ४९ ग्राम ब्राऊनशुगर आढळून आला. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करून आरोपीवर  कलम ८ क २१ ब अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली.  

यांनी केली कारवाईही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक संदीप कापडे, पोलीस निरीक्षक जितेंद्र बांबोडे, पोलीस उपनिरीक्षक सचिन गदाने,  नितीन जाधव, राजेंद्र खनके नितीन साळवे, मिलिंद चव्हाण, अमीर पठाण, अलूप डांगे, जावेद सिद्दकी आदींनी केली.

 

टॅग्स :Drugsअमली पदार्थ