शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटींच्या तहसील क्वॉर्टरवर अतिक्रमण !

By admin | Updated: December 13, 2015 00:53 IST

राजुरा शहरातील सर्वे क्रमांक १४९ मध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. शासकीय अधिकारी आपलीच शासकीय संपत्ती वाचविण्यात असमर्थ ठरत आहेत.

वसतिगृहासाठी जमीन नाकारली : अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीबी. यू. बोर्डेवार राजुराराजुरा शहरातील सर्वे क्रमांक १४९ मध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. शासकीय अधिकारी आपलीच शासकीय संपत्ती वाचविण्यात असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे शासकीय जागेवर तर सोडाच क्वॉर्टरमध्येसुद्धा अतिक्रमण झाल्यामुळे राजुराचे उपविभागीय अधिकाऱ्यांपुढे हे अतिक्रमण हटविणे एक आव्हान ठरले आहे. ज्या अधिकाऱ्यांच्या काळात सर्वे क्रमांक १४९ मध्ये अतिक्रमण झाले, त्या शासकीय अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करून फौजदारी कारवाई करण्याची मागणी होत आहे. राजुरा शहरातील इंदिरानगर परिसरातील तहसील कार्यालयाच्या मालकीची जागा व क्वॉर्टरवर अतिक्रमण करण्यात आले आहे.एक कोटीपेक्षा अधिक किंमत असलेली जागा व क्वॉर्टर ही शासकीय संपत्ती आहे. त्याचेच संरक्षण शासकीय अधिकारी करू शकत नसतील तर सामान्य नागरिकांच्या संपत्तीचे काय रक्षण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राजुरा शहरामध्ये मागील २० वर्षांपासून राजुरा तहसील कार्यालयाचे क्वार्टर असुन या ठिकाणी तहसिल कार्यालयामध्ये कार्यरत कर्मचारी राहत होते. परंतु कर्मचाऱ्यांनी क्वार्टर सोडून आपआपली घरे बांधली. काही किरायाने राहत आहेत. मात्र याच संधीचा फायदा घेऊन येथील काही लोक शासकीय क्वॉर्टरमध्ये अतिक्रमण करून वास्तव्य करीत आहेत. शहरातील १०० कोटीच्या जमिनीवर धनदांडग्यानी अतिक्रमण केले. परंतु शासकीय यंत्रणा मात्र मूग गिळून गप्प बसली आहे. दोन वर्षांपासून शासकीय संपत्तीवर अतिक्रमण झाले असल्याची जाणिव उपविभागीय अधिकाऱ्यांना आहे. परंतु अतिक्रमणधारकांवर कोणतीच कारवाई होत नाही. या उलट गरीबांच्या झोपड्या पाडण्यात मात्र येथील अधिकारी मोठी तत्परता दाखवित आहे.राजुरा शहरातील सर्वे क्रमांक १४९ मधील वैभवशाली तलावातदेखील मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. येथील काही नगरसेवकांनी आपल्या मतांच्या राजकारणासाठी या नागरिकांना आश्रय दिला. त्यामुळे शासकीय संपत्ती या अतिक्रमणधारकांनी गिळंकृत केली. तलावाच्या जुना नकाशाचे अवलोकन केल्यास केवढा मोठा अतिक्रमण आहे, हे लक्षात येईल. पैशासाठी वाट्टेल युक्त्या लढवायला येथील माफीया तयार असुन यामध्ये काही शासकीय अधिकारीसुद्धा गुंतलेले आहेत. येथील काही माफिया पैशाने आम्ही अधिकारी विकत घेतो, या गुर्मीत असून यांची गुर्मी उतरविणारा अधिकारी अजूनपर्यंत राजुऱ्यात आलेला नाही.