शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ठिकठिकाणी ईद साजरी

By admin | Updated: December 27, 2015 01:32 IST

ईदनिमित्त चंद्रपुरात मुस्लिम बांधवांनी रॅली काढली. कमला नेहरून कॉम्पलेक्स समोरील आझाद उर्दू शाळेजवळील चौकात चंद्रपूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी,

चंद्रपूर: जिल्ह्यात ठिकठिकाणी ईद साजरी करण्यात आली. चंद्रपूरईदनिमित्त चंद्रपुरात मुस्लिम बांधवांनी रॅली काढली. कमला नेहरून कॉम्पलेक्स समोरील आझाद उर्दू शाळेजवळील चौकात चंद्रपूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी, विदर्भ किसान मजदूर कॉंगे्रस, एनएसयूआय या संघटनांसह कॉंग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी रॅलीचे स्वागत केले. यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे माजी महासचिव तथा युवा नेते राहुल पुगलिया यांच्या नेतृत्वात स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्व प्रथम अली जनाब मौलाना व अलीम साहब यांचे चंद्रपूर शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे, राहुल पुगलिया व अन्य पदाधिकाऱ्यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर रॅलीतील सहभागी मुस्लिम बांधवांना आईसक्रीम व पाणी पाऊचचे वाटर करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ.सुरेश महाकुलकर, चंद्रपूर जिल्हा कॉंग्रेसचे महासचिव तथा नगरसेवक अशोक नागापुरे, प्रवीण पडवेकर, रमजान अली सय्यद, चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे गटनेते प्रशांत दानव, कॉंग्रेस ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र बेले, सुधाकरसिंह गौर, संजय महाडोळे, नगरसेवक तथा उपगटनेते महेंद्र जयस्वाल, नगरसेवक राजेश रेवलीवार, देवीदास गेडाम, श्रीनिवास पारनंदी, उषा धांडे, शकीना अंसारी, विणा खनके, मन्ना त्रिवेदी, कुशल पुगलिया, महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआयचे उपाध्यक्ष रोशनलाल बिटा, दुर्गेश चौबे, एनएसयूआयचे जिल्हा अध्यक्ष स्वप्नील तिवारी, मोंटू मानकर, कृष्णा यादव, गौस शेख, अरूण बुरडकर, दर्शन बुरडकर, विनोद पिंपळशेंडे, बापू अन्सारी, हबीबभाई मेमन, अस्लमभाई, ताजुभाई, गफ्फारभाई, रामदास वागदरकर, गजानन दिवसे, अनिल तुंगीडवार, विरेंद्र आर्य, बाबुलाल करूणाकर, सुधाकर चन्ने, मेजर सातपुते, दिगांंबर लोडेलीवार यांच्यासह कॉंग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.बल्लारपूरबल्लारपुरातही भाजपा अल्पसंख्यक आघाडीचे उपाध्यक्ष यांच्या पुढाकारात उत्साहात ईद साजरी करण्यात आली. ईदच्या पूर्वसंध्येला भाजपा नेते चंदनसिंह चंदेल, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, जामा मस्जिदचे अध्यक्ष हाजी शेख उस्मान, अर्जून नाथानी, शेख ईलीयास यांच्या प्रमुख उपस्थितीत गरजूंना ब्लँकेट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी भाजपा अल्पसंख्यक सेलचे शेख जुम्मन रिजवी, शेख लाल, असरार अहेमद खान, वसीम खान, अब्दुल खलील, अब्दुल जमिल, हारूनभाई अब्दूल समर, अलसमभाई, शेख ईमरान, शेख आशिक, ुमुस्ताक खान, ईलियासभाई, शेख हबीब, जुनेद कच्छी, शेख युसूफ, सलिम मिर्झा बेग, शेख अजर, शेख जाकीर, अब्दुल वकील, शेख कुरबान, अरमान, शेख करीम यांनी परिश्रम घेतले. याचनिमित्ताने २४ डिसेंबरला मुस्लीम बांधवांच्यावतीने बल्लारपुरातील रेल्वे चौकात रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर उपस्थित होते. राजुराईदनिमित्त मुस्लीम बांधवांच्यावतीने आझाद चौकात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. मुस्लीम बांधवांत रक्तदानाविषयी जनजागृती व्हावी, या दृष्टिकोनातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सुशीलकुमार नायक, जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, न.प.सदस्य सखावत अली यांनी भेट दिली. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी सैयद जावेद अली, शीबर अली, महंमद जावेद, सैय्यद यकीन, सैय्यद मुसरत अली, सैय्यद अनवर अली, मोहसिन कुरेशी, आरिफ खान पठाण, अब्दुल शायाब, महंमद जुनेद, मुस्ताक कुरेशी आदींनी परिश्रम घेतले.