शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

सिंदेवाही तालुक्यात कोरडा दुष्काळ

By admin | Updated: July 8, 2014 23:24 IST

सिंदेवाही तालुक्यात मागील तीन वर्षांपासून सतत ओला आणि कोरडा दुष्काळ पडत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. तालुक्यात यावर्षी खरीप हंगामात १८ हजार ८०० हेक्टर क्षेत्र धानपीक लागवडी खाली आहे.

सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यात मागील तीन वर्षांपासून सतत ओला आणि कोरडा दुष्काळ पडत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. तालुक्यात यावर्षी खरीप हंगामात १८ हजार ८०० हेक्टर क्षेत्र धानपीक लागवडी खाली आहे. तसेच एक हजार ४०० हेक्टरवर तूर, ८० हेक्टरवर हळद, ७५ हेक्टरवर भाजीपाला, ८० हेक्टरवर सोयाबिन, २५० हेक्टरवर तिळाचे पीक लागवडीखाली आहे. यावर्षी एक हजार २०० मि.मी.सरासरी पाऊस पडेल, अशी अपेक्षा होती. आर्द्रा नक्षत्र लागून १५ दिवस झाले. मात्र या नक्षत्रातसुद्धा पाऊस पडला नाही.त्यामुळे धान उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. सिंदेवाही तालुक्यात भाताचे प्रमुख पीक आहे.यावर्षी सर्व बि-बियाणे, रासायनिक खते व किटकनाशक औषधी यांचे भाव वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यावर्षी मात्र नैसर्गिक परिस्थिती लक्षात घेता वरुणराजाच्या अवकृपेने धान पिकाचे नियोजन बिघडण्याची भीती निर्माण झाली आहे. सिंदेवाही तालुक्यात एकही मोठा सिंचन प्रकल्प नाही. निसर्गाच्या भरवशावर या तालुक्यातील धान पिके अवलंबून आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील तलाव बोड्या, नदी-नाले कोरड्या अवस्थेत आहेत. धान पिकासाठी एक हजार २०० मि.मी.पापावसाची आवश्यकता आहे. आतापर्यंत ४ जुलैपर्यंत केवळ ८० मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. मागील वर्षी ६०० मि.मी पाऊस पडला होता. तालुक्यात १०० टक्के धान पेरण्या आटोपल्या आहेत. काही परिसरात पेरणी केलेले धान बियाणांना अंकुर फुटले आहे.परंतु पावसाअभावी अंकुर करपून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे आहे. नदी- नाले कोरडे पडले असून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांना चारा व पाणी नाही. तालुक्यात पेरणी योग्य पाऊस पडला नाही. सध्या तरी तालुक्यातील शेतकरी संकटात असून पावसाची प्रतीक्षा आहे. (तालुका प्रतिनिधी)