शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

डीजे व्यावसायिकांचा जिल्हा कचेरीवर मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:37 IST

शासनाच्या नियमानुसार ७५ डेसीबल आवाजापर्यंत डीजे वाजविण्याची परवानगी असतानाही चंद्रपूर जिल्ह्याच्या नव्या पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी डीजे वाजवण्यावर सरसकट बंदी घातली आहे.

उपासमारीची पाळी : पोलीस अधीक्षकांच्या बंदी निर्णयाचा विरोधलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासनाच्या नियमानुसार ७५ डेसीबल आवाजापर्यंत डीजे वाजविण्याची परवानगी असतानाही चंद्रपूर जिल्ह्याच्या नव्या पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी डीजे वाजवण्यावर सरसकट बंदी घातली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ३५० डीजे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या या निर्णयाच्या विरोधात चंद्रपूर जिल्हा साऊंड सिस्टम असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी गांधी चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हाथावर काळी पट्टी बांधून मूक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे ३५० डीजे व्यावसायिक आहेत. सर्व व्यावसायिकांनी बँकेतून तसेच नातेवाईकांकडून कर्ज घेऊन डीजेचा व्यवसाय सुरु केला. मात्र पोलीस विभागाकडून डीजे वाजण्यावर सरसकट बंदी घातली. त्यामुळे डीजे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. तसेच कर्ज फेडण्यास अडचण निर्माण झाली आहे. ३ एप्रिलला पोलीस विभागाने बैठक घेऊन लग्न समारंभ तसेच मिरवणुकीत इतर वाद्यांना बंदी घातली. त्यामुळे मागील चार महिन्यापासून डीजे व्यवसाय बंद आहे. त्यामुळे डीजे व्यावसायिक व त्यावर काम करणाऱ्यावर मजुरावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात चंद्रपूर जिल्हा साऊंड सिस्टम असोसिएशन चंद्रपूरच्या वतीने गांधी चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हाथावर काळी पट्टी बांधून मूक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.सदर निवेदनात डीजे व्यावसायिकांवरिल सर्व कर्ज माफ करण्याची मागणी करण्यात आली. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष उमेश लांडगे, सचिव अभिजीत बेले, कोषाध्यक्ष हर्षद साखरकर तसेच संस्थेच पदाधिकारी व जिल्ह्यातील डीजे व्यावसायिक उपस्थित होते.