बल्लारपुरात आठ हजार क्विंटल रेशनचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 05:00 AM2020-08-04T05:00:00+5:302020-08-04T05:00:06+5:30

बल्लारपूर तालुक्यात १४ हजार ४९८ कुटुंबाकडे प्राधान्य कुटुंब लाभार्थी, एक हजार ८६४ केशरी शिधापत्रिकाधारक, सात हजार ४५४ पिवळी शिधापत्रिकाधारक आहेत. अंतोदय लाभार्थ्यांना १५ किलो गहू, २० किलो तांदूळ असे एकूण ३५ किलो धान्य तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना ५ किलो तांदूळ व १ किलो चना डाळ वितरीत करण्यात येत आहे.

Distribution of eight thousand quintals of ration in Ballarpur | बल्लारपुरात आठ हजार क्विंटल रेशनचे वाटप

बल्लारपुरात आठ हजार क्विंटल रेशनचे वाटप

Next
ठळक मुद्दे२१ हजार ३७० लाभार्थी : पंतप्रधान गरीब कल्याण योजना

मंगल जीवने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : शासनातर्फे सुरु करण्यात आलेल्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांसाठी पाच किलो तांदूळ व एक किलो डाळ मोफत देण्यात आले. त्यानुसार एप्रिल ते जून या तीन महिन्यात बल्लारपूर तालुक्यातील ६६ रास्तभाव दुकानदारांनी अंतोदय व प्राधान्य कुटुंबातील २१ हजार ३७० लाभार्थ्यांना सुमारे आठ हजार १४४.४ क्विंटल रेशन वाटप करण्यात आले.
बल्लारपूर तालुक्यात १४ हजार ४९८ कुटुंबाकडे प्राधान्य कुटुंब लाभार्थी, एक हजार ८६४ केशरी शिधापत्रिकाधारक, सात हजार ४५४ पिवळी शिधापत्रिकाधारक आहेत. अंतोदय लाभार्थ्यांना १५ किलो गहू, २० किलो तांदूळ असे एकूण ३५ किलो धान्य तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना ५ किलो तांदूळ व १ किलो चना डाळ वितरीत करण्यात येत आहे. जून महिन्यात अंत्योदय योजनांच्या सुमारे सात हजार ३०७ लाभार्थ्यांना एक हजार ३६९ क्विंटल तांदूळ व ७३.०५ क्विंटल चण्याची डाळ, प्राध्यान्य कुटुंबातील १४ हजार ६५ कुटुंबांना २ हजार ७६४.०८ क्विंटल तांदुळ व १४०.६५ क्विंटल डाळ वाटप काण्यात आली. याप्रमाणे एप्रिल व मे महिन्यात धान्य वाटप करण्यात आले. तर मे व जून महिन्यात राबविण्यात आलेल्या आत्मनिर्भर योजनेतंर्गत बल्लारपूर तालुक्यातील एक हजार ५२२ कुटुंबातील ५ हजार ४०० व्यक्तीस ५४० क्विंटल तांदूळ व ३० क्विंटल चण्याची डाळ वाटप करण्यात आली.

ग्राहकांना पावती द्यावी
रेशन दुकानातून होणाऱ्या स्वस्त धान्याची विक्री अत्यंत पारदर्शक पद्धतीने व्हावी, या उद्देशाने तालुक्यातील सर्व दुकानांमध्ये पॉस मशीन लावण्यात आली आहे. रास्तभाव दुकानदारांनी अन्नधान्य वाटप करताना त्या शिधापत्रिकेच्या क्रमांक, त्यावरील सदस्यांची संख्या तसेच शिधापत्रिकेवरील इतर संपूर्ण तपशील आदींच्या नोंदी स्वतंत्र नोंदवहीत ठेवायच्या आहेत. व धान्य घेतलेल्या ग्राहकास दुकानदाराने ई-पास मशीनची पावती देण्याचे निर्देश असताना अनेक रेशन दुकानदार ग्राहकास ही पावती देत नसल्याच्या तक्रार आहेत.

खºया लाभार्थ्यापर्यंत अंत्योदय व अन्य योजतंर्गत स्वस्त दरातील धान्य पोहचावे व ग्राहकांना रीतसर ई-पास पावती देण्याचे आमचे निर्देश आहे. याचे उल्लंघन कोणी रेशन दुकानदार करीत असल्याची तक्रार आल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
- प्रियंका खाडे, पुरवठा निरीक्षक,
तहसील कार्यालय, बल्लारपूर

Web Title: Distribution of eight thousand quintals of ration in Ballarpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.