ऑनलाईन शिक्षणासाठी शिक्षकांनी खरेदी केला डिश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 05:01 IST2020-07-26T05:00:00+5:302020-07-26T05:01:17+5:30

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी निकिता काटकर यांची शिक्षणप्रेमी म्हणून नियुक्ती करण्यात आली. स्वत:च्याच घरी मुलांना गटागटाने बोलावून सोशल डिस्टंन्स्टिंगपालन करून शिक्षक शिकविण्याचे काम करीत आहेत. व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कातकर या स्वयंसेवक म्हणून सेवा देत आहे. शिक्षक घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करीत आहेत.

Dish purchased by teachers for online education | ऑनलाईन शिक्षणासाठी शिक्षकांनी खरेदी केला डिश

ऑनलाईन शिक्षणासाठी शिक्षकांनी खरेदी केला डिश

ठळक मुद्देगुडगाव शाळेचा उपक्रम । पालकांचेही सहकार्य

लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : २६ जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू झाले पण यंदा शाळेची घंटा वाजली नाही. त्यामुळे कोरोना संकटात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी गुडगाव (वडेगाव) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी ऑनलाइनशिक्षणासाठी टीव्ही डिश खरेदी केला. याद्वारे मुलांना ऑनलाईन ज्ञानाचे धडे देणे सुरू केले आहे.
घरी टीव्हीची सुविधा नसलेल्या विद्यार्थ्यांना दूरदर्शनवरील शैक्षणिक कार्यक्रम बघता येण्यासाठी सरपंच मीना भुसारी, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष रूपा कातकर, मुख्याध्यापक छत्रपती राऊत व शिक्षकांनी शाळेत स्काय डिश खरेदी करून शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. जिल्ह्यात अशा प्रकारचा उपक्रम राबवणारी पहिली शाळा आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी निकिता काटकर यांची शिक्षणप्रेमी म्हणून नियुक्ती करण्यात आली. स्वत:च्याच घरी मुलांना गटागटाने बोलावून सोशल डिस्टंन्स्टिंगपालन करून शिक्षक शिकविण्याचे काम करीत आहेत. व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कातकर या स्वयंसेवक म्हणून सेवा देत आहे. शिक्षक घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करीत आहेत. स्वंय अध्ययन स्वाध्याय पुस्तिका वितरण केले आहे. शिक्षणाधिकारी लोखंडे यांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांशी दूरध्वनीवरून सावध साधून विधायक सूचना केल्या. गटशिक्षणाधिकारी धनपाल फटिंग, विस्तार अधिकारी विजय भोयर, अपंग समावेशित शिक्षण तज्ज्ञ विनोद मून आदींनीही शाळेला भेट देवून उपक्रमांची पाहणी केली.

Web Title: Dish purchased by teachers for online education