शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेची प्रगती भाजपाच्या डोळ्यात खुपते

By admin | Updated: February 23, 2016 00:41 IST

राज्यात भाजपा-सेनेचे सरकार विराजमान असले तरी भद्रावती नगर परिषदेला राजकीय आकसापोटी भाजपाच्या अर्थमंत्र्यांनी एक रुपयाचाही निधी न दिल्याने ...

आकसापोटी अन्याय : शासनविरोधात अनिल धानोरकरांचा एल्गारभद्रावती : राज्यात भाजपा-सेनेचे सरकार विराजमान असले तरी भद्रावती नगर परिषदेला राजकीय आकसापोटी भाजपाच्या अर्थमंत्र्यांनी एक रुपयाचाही निधी न दिल्याने भाजपा सरकार विरोधात तिव्र आंदोलन उभारण्याचे जाहीर करून भद्रावतीचे नगराध्यक्ष व शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल धानोरकर यांनी शासन विरोधात एल्गार पुकारला आहे. भद्रावती नगर परिषदेची प्रगती भाजपाच्या डोळ्यात खुपत आहे. त्यामुळे भाजपाचे मंत्री भद्रावती पालिकेला निधीबाबत डावलून विकासापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे, असा खळबळजनक आरोप करीत धानोरकरांनी शासनाला घरचा अहेर दिला आहे.नगरपरिषदांना वैशिष्टपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेतंर्गत निधी दिला जातो. चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपरिषदांना शासनातर्फे असा निधी वितरीत करण्यात आला. जिल्ह्यातील अकरा पैकी दहा नगर पालिकांना १२७ कोटींचा निधी वाटप करण्यात आला. मात्र भद्रावती नगरपालिकेला यातून हेतुपुरस्सर वगळण्यात आले. अर्थमंत्र्यांनी स्वत:च्या मतदारसंघात ७२ कोटींचा निधी दिला. राजकीय आकसापोटी भद्रावती नगरपालिकेला या निधीपासून वंचित ठेवण्यात आले. असे ते म्हणाले.नगर परिषदेच्या स्थापनेपासून शिवसेनेची सत्ता भद्रावती नगरपालिकेवर आहे. श्रमदानातून स्वच्छता, घनकचरा प्रकल्प, शौचालयाचे उद्दिष्ट, २४ तास पाणीपुरवठा करणे, यासारख्या अनेक विकासात्मक योजना शिवसेनेच्या काळात राबविण्यात आल्या. या ठिकाणी भाजपाचा एकही नगरसेवक नाही. एक होता तोही शिवसेनेत दाखल झाला.तसेच या नगरपालिकेचे मार्गदर्शक असलेले आमदार बाळू धानोरकर हे पूर्व विदर्भातील शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत. या क्षेत्रातील शिवसेनेची प्रगती सत्तेत असलेल्या भाजपाच्या डोळ्यात खुपत असल्याने निधीबाबत भद्रावती नगरपालिकेला अर्थमंत्र्यांकडून डावलण्यात येत आहे, असे धानोरकर म्हणाले.स्वत: नगराध्यक्ष तथा जिल्हा शिवसेना प्रमुख तसेच शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर इतके प्रयत्न करूनही सत्तेतील भाजपा विकासात्मक कामात आडकाठी आणत असेल तर इतरांचे काय, असा सवालही त्यांनी केला.२०१३ मध्ये पर्यटन निधी अंतर्गत एक कोटी ९० लाख रुपये भद्रावती नगरपरिषदेला मंजूर झाले. कामे पुर्ण झाली. जुन्या सरकारने यातील फक्त २५ लाख रुपये दिले. नविन सरकारने उर्वरित रकमेतील एक छदामही दिला नाही. यामुळे यापेक्षा जुने सरकार चांगले होते, असे म्हणण्याचे वेळ आपल्यावर आल्याचे ते म्हणाले.सुजल निर्मल योजनेतंर्गत वैयक्तिक शौचालय व नळ जोडणीसाठी तीन कोटी ६३ लाखांची योजना जुन्या शासनाने मंजूर केली. त्यापैकी अजूनही १ कोटी १४ लाख शिल्लक आहेत. मात्र या शासनाने अजूनपर्यंत एक रुपयाही दिलेला नाही. शासनाच्या या धोरणामुळे वैयक्तिक शौचालयाचे काम अपुर्ण आहे. यामुळे पंतप्रधान मोदींच्या स्वच्छता अभियानाला याठिकाणी तडा जाण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले. भद्रावती नगर परिषदेचा हक्काचा असलेला निधी त्वरित देण्यात यावा. विकासात्मक कामाच्या बाबतीत भद्रावतीकरांसोबत राजकारण करू नये. अन्यथा भद्रावतीकर भाजपाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)