शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

हताश शेतकऱ्याने सोयाबीन पिकांवर फिरवला नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:00 IST

राजुरा तालुक्यातील गोवरी येथील शेतकरी नागेश्वर देविदास ठेंगणे यांनी दोनदा सोयाबीनची पेरणी करूनही बियाणे उगवले नाही. अखेर हताश झालेल्या शेतकऱ्याने सोयाबीन पिकावरच नांगर फिरवल्याची घटना गोवरी येथे घडली. बोगस बियाणे कंपनीविरुद्ध रोष करण्यात येत असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी लगबगीने सोयाबीनची पेरणी केली. कोरोनाचे संकट उभे ठाकले असतानाच कशीबशी पेरणी करून शेतकऱ्यांनी उद्याचे स्वप्न बघत पिकांची लागवड केली. मात्र राजुरा तालुक्यातील गोवरी येथील शेतकरी नागेश्वर देविदास ठेंगणे यांनी दोनदा सोयाबीनची पेरणी करूनही बियाणे उगवले नाही. अखेर हताश झालेल्या शेतकऱ्याने सोयाबीन पिकावरच नांगर फिरवल्याची घटना गोवरी येथे घडली. बोगस बियाणे कंपनीविरुद्ध रोष करण्यात येत असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.पावसाला सुरुवात होताच शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची लगबगीने लागवड केली. उद्याचे स्वप्न डोळ्यात साठवून शेतकऱ्यांनी पैशाची जुळवाजुळव करून कशीबशी शेती केली. कोरोना महामारीचे भयानक संकट उभे असतानाही रखरखत्या उन्हात शेतकऱ्यांनी शेतीची मशागत केली. मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच दमदार पाऊस पडल्याने गोवरी येथील शेतकरी नागेश्वर देविदास ठेंगणे यांनी सोयाबीनची पेरणी केली. मात्र त्यानंतर आठ-दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी शेतात पेरणी केलेले सोयाबीनचे तीन एकरातील बियाणे उगवले नाही. नामांकित कंपन्यांच्या सोयाबीन बियाणांची पेरणी करूनही उगवले नसल्याने त्यांनी पुन्हा सोयाबीनची पेरणी केली. मात्र बियाणे उगवले नाही. शेवटी हताश होऊन शेतकरी नागेश्वर ठेंगणे यांनी सोयाबीन पिकावर नांगर फिरविले.कृषी विभागाकडे शेतकऱ्यांच्या तक्रारीराजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केलेले बहुतांश सोयाबीनचे बियाणे उगवले नाही. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची दुबार पेरणी केली. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. राजुरा येथील कृषी विभागाकडे शेतकऱ्यांनी सोयाबीनचे नामांकित कंपनीचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी केल्या आहे, अशी माहिती राजुरा तालुका कृषी अधिकारी जी.के. कडलग यांनी दिली.

 

टॅग्स :agricultureशेती