शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

भद्रावतीत माणुसकीच्या भिंतीसाठी अलोट गर्दी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:45 IST

जाती-पाती व धर्माची वर्गवारी करणाऱ्या सगळ्याच भिंती जमिनदोस्त करणारी भिंत म्हणजे माणूसकीची भिंत.

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : जाती-पाती व धर्माची वर्गवारी करणाऱ्या सगळ्याच भिंती जमिनदोस्त करणारी भिंत म्हणजे माणूसकीची भिंत. राजस्थानच्या बिलवारा शहरातून सुरु झालेला ‘माणूसकीची भिंत’ हा उपक्रम भद्रावतीत पोहचला. अन् या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला. देणाऱ्या आणि घेणाऱ्यांची या भिंतीजवळ अलोट गर्दी उसळली. रोटरी क्लब, इनर्व्हील क्लब, भद्रावती व विवेकानंद महाविद्यालय भद्रावती यांच्या वतीने ही माणूसकीची भिंत साकारण्यात आली.नको असेल ते द्या- हवे असेल ते घेवून जा, असे आवाहन करणारी ही भिंत आज सर्वत्र सामाजिक दायित्वाची सर्वांना जाणीव करून देत आहे. एकीकडे माणसांच्या ऋणानुबंधात, एकमेकांच्या नातेसंबंधात अनावश्यक गोष्टीच्या भिंती निर्माण होत आहे. तर दुसरीकडे ही भिंत माणसांना एकमेकांशी जोडत आहे. विवेकानंद महाविद्यालय भद्रावती येथे आयोजित या उपक्रमात दात्यांच्या मदतीने जुने व नवीन कपडे तसेच जीवनोपयोगी साहित्य प्राप्त करुन ते समाजातील गरीब, गरजू व वंचितांना मोफत उपलब्ध करुन देण्यात आले. जवळपास तीन ते चार हजार गरजू व वंचितांना सदर साहित्य वितरित करण्यात आले. नव्हे तर ते त्यांनी हक्कानीच घेतले. माणूसकीच्या भिंतीने त्यांना हा हक्क प्रदान केला होता. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हेच या उपक्रमाचे फलित ठरले.२५ बॉय १५ फूट एवढी भिंत विवेकानंद महाविद्यालयात साकारण्यात आली आहे. मागील तीन महिन्यांपासून रोटरी क्लब, इनरव्हील क्लब, भद्रावती व विवेकानंद महाविद्यालयातर्फे जुने कपडे गोळा करण्याचे काम सुरु आहे. चार ते पाच हजार जुने कपडे या कालावधीत गोळा करण्यात आले. त्यात साड्या, शर्ट, पँट, लहान मुला-मुलींचे कपडे, ब्लँकेट, स्वेटर, छत्र्या, बांगड्या व अन्य संसारोपयोगी वस्तूूंचा समावेश होता. यासोबतच आयोजकांतर्फे ७५ हजार रुपयांचे नवीन साहित्य घेवून ते वाटप करण्यात आले. हा उपक्रम समोरही राबविल्या जाणार असून भिंतीला कपडे अटकवून ठेवण्यात येणार आहे. ज्यांना हवे असेल ते कपडे ते घेऊन जाऊ शकतात. सोबतच दात्यांनी जुने कपडे आणून द्यावे, असे आवाहनही आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. माणूसकीच्या भिंतीचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रभर व्हावा. चंद्रपूर जिल्ह्यात लगेच माणूसकीच्या भिंती निर्माण करु,असे या भिंतीच्या पहिल्या उदघाटनप्रसंगी वित्त, नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेले आवाहन याप्रसंगी महत्वाचे ठरते. या उपक्रमाचे जिल्ह्यात सर्वत्र अनुकरण व्हावे. निश्चितच ती गरज आहे.