कोरपन्यातील शासकीय सदनिकांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 06:00 AM2020-03-20T06:00:00+5:302020-03-20T06:00:40+5:30

कोरपना शहरातील बाजारवाडी भागात या सदनिका आहे. पूर्वी याठिकाणी तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन आदी कार्यालयातील कर्मचारी राहत होते. या सदनिका मोळकडीस आल्याने आता राहण्यायोग्य राहिल्या नाही. दहा वर्षापूर्वी तहसील कार्यालयात मागील भागात तेथील कर्मचाऱ्यांसाठी वेगळ्या सदनिका बांधण्यात आल्या. मात्र त्याठिकाणी एकही कर्मचारी राहण्यास तयार नाही.

Correction of governing house | कोरपन्यातील शासकीय सदनिकांची दुरवस्था

कोरपन्यातील शासकीय सदनिकांची दुरवस्था

Next
ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : शासकीय कर्मचारी राहतात भाड्याच्या घरात

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : येथे १९८० च्या दशकात सीआरपीएफ कॅम्पसाठी राखीव सदनिका बांधल्या. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. पुढे त्याच सदनिका कोरपना येथील अनेक शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी तात्पुरती निवासस्थानाची सोय म्हणून उपयोगात आणण्यात आल्या. परंतु आजघडीला या संपूर्ण सदनिकांची दुरवस्था झाली असून धोका होण्याची शक्यता आहे.
कोरपना शहरातील बाजारवाडी भागात या सदनिका आहे. पूर्वी याठिकाणी तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन आदी कार्यालयातील कर्मचारी राहत होते. या सदनिका मोळकडीस आल्याने आता राहण्यायोग्य राहिल्या नाही. दहा वर्षापूर्वी तहसील कार्यालयात मागील भागात तेथील कर्मचाऱ्यांसाठी वेगळ्या सदनिका बांधण्यात आल्या. मात्र त्याठिकाणी एकही कर्मचारी राहण्यास तयार नाही. कोरपना येथे कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी अद्यापही सदनिका नाही. त्यामुळे त्यांना इतरत्र ठिकाणी किरायाने रहावे लागत आहे. याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

परिसराची स्वच्छता करण्याची मागणी
सदर परिसरातील सदनिका मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे येथे केरकचरा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे हिंस्त्र प्राण्याचा वावर आहे. येथे स्वच्छता करणे गरजेचे आहे.

Web Title: Correction of governing house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.