शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

मनपाकडून रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्ट सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:01 IST

या लॅबमध्ये दररोज १२५ ते २०० चाचण्या करण्याची क्षमता असून याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. कोविड-१९ चाचण्यांचा निकाल उपलब्ध होण्याचा कालावधी कमी होणार असून रुग्णांवर उपचारदेखील लवकरात लवकर होण्यास मदत होणार आहे. सध्या या कोविड-१९ चाचणी केल्यानंतर निकाल यायला साधारण १२ तासांचा अवधी लागतो.

ठळक मुद्देचंद्रपुरातील नागरिकांना मिळणार फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसात सातत्याने वाढत असलेल्या कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी, कोविड-१९ च्या जास्तीत जास्त चाचण्या केल्या जाव्यात. तसेच या चाचण्यांचा निकाल लवकरात लवकर मिळण्याकरिता चंद्रपूर महानगरपालिकेने स्वत:चे पहिले कोविड-१९ अ‍ॅन्टिजन टेस्टींग सेंटर जटपुरा वॉर्ड येथील सरदार वल्लभभाई पटेल शाळा येथे सुरु करण्यात आले आहे.या लॅबमध्ये दररोज १२५ ते २०० चाचण्या करण्याची क्षमता असून याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. कोविड-१९ चाचण्यांचा निकाल उपलब्ध होण्याचा कालावधी कमी होणार असून रुग्णांवर उपचारदेखील लवकरात लवकर होण्यास मदत होणार आहे. सध्या या कोविड-१९ चाचणी केल्यानंतर निकाल यायला साधारण १२ तासांचा अवधी लागतो. रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्टींग सेंटरच्या माध्यमातून चाचणी केल्यानंतर केवळ १५ ते ३० मिनिटात चाचणीचे निकाल प्राप्त होत असल्याने योग्यवेळी कोविड संशयित व्यक्तींस गाठून त्याच्यावर वेळेत उपचार करणे शक्य होणार आहे.आयुक्त राजेश मोहिते यांनी मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. कीर्ती राजुरवार यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्टींग सेंटर येथील नोडल अधिकारी म्हणून डॉ. वनिता गर्गेलवार यांच्याकडे जबाबदारी सोपविलेली आहे. त्यांना सहाय्यक म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री वाडे तसेच विद्या चौधरी, स्नेहल शंभरकर, अनिता बंडेलवार, स्मिता उराडे, बालाजी जाधव, शुभम दिवसे, राकेश सोयाम व प्रलय पडगलेवार अशी मनपा टीम येथे कार्यरत आहे.येथे करण्यात येणाऱ्या चाचण्या या इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्चच्या दिशा निर्देशानुसारच करण्यात येतात.कोविडसदृश्य लक्षणे, ताप, सर्दी, थकवा, खोकला असलेल्या व्यक्ती, कंटेनमेंट झोन किंवा हॉटस्पॉट क्षेत्रातील रुग्ण यांची विशेषत: तपासणी केली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या