योजनेत बांधकाम विभागाचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 05:00 AM2020-07-13T05:00:00+5:302020-07-13T05:01:04+5:30

या संदर्भात नगर परिषद मुख्याधिकारी यांनी बांधकाम विभाग चंद्रपूर यांना २४ जून २०२० ला पत्र दिले. रस्त्याचे बाजूने बांधकाम विभागाने साईड पट्टीचे काम सुरु केले आहे. ते जर पूर्ण झाले तर मजीप्राच्या जलवाहिन्या टाकण्यासाठी पुन्हा पक्का मार्ग खोदावा लागेल व शासकीय निधी वाया जाईल म्हणून काम थांबवावे, असे पत्रात म्हटले आहे. परंतु बांधकाम विभागाने ते काम न थांबविता अजूनही जलवाहिन्या टाकण्यासाठी परवानगी दिली नाही.

Construction department's plan in the plan | योजनेत बांधकाम विभागाचा खोडा

योजनेत बांधकाम विभागाचा खोडा

Next
ठळक मुद्देपाणी पुरवठा योजना : जलवाहिन्या टाकण्यास परवानगी नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : मागील दोन वर्षांपासून बल्लारपूर शहराला २४ तास पाणी मिळावे म्हणून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत बल्लारपूर शहरातील वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. मात्र रस्त्याच्या बाजूने जलवाहिन्या टाकण्याची परवानगी बांधकाम विभागाकडून मिळत नसल्यामुळे मागील दोन महिन्यांपासून मजीप्राचे काम थंडबस्त्यात आहे.
या संदर्भात नगर परिषद मुख्याधिकारी यांनी बांधकाम विभाग चंद्रपूर यांना २४ जून २०२० ला पत्र दिले. रस्त्याचे बाजूने बांधकाम विभागाने साईड पट्टीचे काम सुरु केले आहे. ते जर पूर्ण झाले तर मजीप्राच्या जलवाहिन्या टाकण्यासाठी पुन्हा पक्का मार्ग खोदावा लागेल व शासकीय निधी वाया जाईल म्हणून काम थांबवावे, असे पत्रात म्हटले आहे. परंतु बांधकाम विभागाने ते काम न थांबविता अजूनही जलवाहिन्या टाकण्यासाठी परवानगी दिली नाही. यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची २४ तास पाणी पुरवठा योजना अपूर्ण आहे. बांधकाम विभाग एक महिन्यापासून राज्यमार्गाच्या बाजूने ज्या साईड पट्टीचे काम करीत आहे, त्याच्या डाव्या बाजूने बल्लारपूरसाठी दुसरी जलवाहिनी टाकण्याचे काम करायचे आहे. परंतु या कामास सार्वजनिक बांधकाम विभाग भद्रावती यांनी अजूनपर्यंत मंजुरी दिली नसल्याचे मजीप्रा अभियंता यांनी सांगितले.

बल्लारपूर पाणी पुरवठा योजना टप्पा-२ अंतर्गत बल्लारपूर शहरातून कलामंदिर ते गुरुनानक कॉलेजपर्यंत पाईपलाईन टाकण्याच्या संदर्भात बल्लारपूर नगर परिषदेने पत्र दिले. कामाची पाहणी झाली. दोनदा सार्वजनिक बांधकाम विभागाशी बैठकीत चर्चा करण्यात आली. तरी अजूनपर्यंत परवानगी मिळाली नाही. यामुळे कामास उशीर होत आहे.
- सुशील पाटील, उपविभागीय अभियंता,मजीप्रा, बल्लारपूर.

Web Title: Construction department's plan in the plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी