शिक्षण विभागाच्या सर्व्हेक्षणामुळे पालकामंध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 05:00 AM2020-05-18T05:00:00+5:302020-05-18T05:01:00+5:30

कोरोनामुळे यावर्षी प्रथमच उन्हाळ्याच्या सुट्या परीक्षा न घेताच सुरू झाल्या. सुटीचा कालावधी वाढत असल्यामुळे शिक्षण विभागाने ‘होम फार्म स्टडी’ योजना सुरु करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. या प्रयत्नाला ग्रामीण भागातील पालक किती सहकार्य करतात, ते भविष्यात कळणारच आहे. मात्र सध्या शिक्षण विभागाने केंद्र प्रमुख्यांच्या माध्यमातून मुख्याध्यापकांना पालकांकडून माहिती गोळा करण्याच्या सुचना दिल्या असून त्याचा रिपोर्ट तत्काळ कळविण्याचे आदेश दिले आहे.

Confusion among parents due to education department survey | शिक्षण विभागाच्या सर्व्हेक्षणामुळे पालकामंध्ये संभ्रम

शिक्षण विभागाच्या सर्व्हेक्षणामुळे पालकामंध्ये संभ्रम

Next
ठळक मुद्देशिक्षकांना मनस्ताप : रेडिओ, टीव्ही, मोबाईल, होम लर्निंग संदर्भात विचारणा सूरू

साईनाथ कुचनकार।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनामुळे सर्व विस्कळीत झाले आहे. असे असतानाच जिल्हा परिषद शिक्षण विभागाने ग्रामीण भागात आता नवीन सर्व्हेक्षण सुरु केले आहे. या सर्व्हेक्षणामुळे पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून कोरोनाच्या महामारीमध्ये शासनस्तरावर आपल्याला काही तरी मिळतील, अशी अपेक्षा पालकांमध्ये व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे पालकांच्या प्रश्नांना उत्तर देताना शिक्षकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
कोरोनामुळे यावर्षी प्रथमच उन्हाळ्याच्या सुट्या परीक्षा न घेताच सुरू झाल्या. सुटीचा कालावधी वाढत असल्यामुळे शिक्षण विभागाने ‘होम फार्म स्टडी’ योजना सुरु करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. या प्रयत्नाला ग्रामीण भागातील पालक किती सहकार्य करतात, ते भविष्यात कळणारच आहे. मात्र सध्या शिक्षण विभागाने केंद्र प्रमुख्यांच्या माध्यमातून मुख्याध्यापकांना पालकांकडून माहिती गोळा करण्याच्या सुचना दिल्या असून त्याचा रिपोर्ट तत्काळ कळविण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे सर्व शिक्षक सध्या पालकांकडील माहिती गोळा करण्याच्या कामाला लागले आहे.
या माहितीमध्ये विद्यार्थ्यांच्या घरी मोबाईल, रेडिओ, टीव्ही आहे का, मोबाईल असेल तर अ‍ॅन्ड्राईड आहे की साधा, किती जणांच्या मोबाईलमध्ये व्हॅटस्अ‍ॅप आहे आदींसह इतर सुविधा संदर्भात शिक्षकांना माहिती घ्यावी लागत आहे. त्यामुळे शिक्षक आपल्या परीने काही पालकांच्या घरी जावून तसेच मोबाईलद्वारे संपर्क साधून यासंदर्भात माहिती घेत आहे.
सध्या कोरोनामुळे सर्वच नागरिक त्रस्त आहे. अशातच शिक्षकांकडून सुरू असलेल्या सर्वेक्षणामुळे पालकांच्या अपेक्षा वाढल्या आहे.
भविष्यात शासनाकडून आपल्याला काही तरी मिळतील, अशी पालकांची अपेक्षा असल्यामुळे अनेक पालक आपल्या घरी टीव्ही, रेडियो तसेच अ‍ॅन्ड्राईड मोबाईल नसल्याचे सांगून मोकळे होत आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागातील अन्य नागरिक शिक्षकांना शासनाची कोणती योजना आहे, आम्हचेही नाव टाका म्हणून सतावत असल्याचा प्रकार सुरु आहे. यामध्ये मात्र शिक्षकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

शिक्षकांना अशी द्यावी लागणार माहिती
व्हॅटस्अ‍ॅप द्वारे संपर्क साधता येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, एसएमएस द्वारे संपर्क साधता येणाºया विद्यार्थ्यंची संंख्या, मोबाईल नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, टीव्ही सुविधा असणारे विद्यार्थी संख्या, रेडिओ सुविधा असणारे विद्यार्थी संख्या, मोबाईल, रेडिओ, टीव्ही यापैकी कोणतीही सुविधा नसणारे विद्यार्थी संख्या, किती पालकांना होम लर्निंग सुविधा उपलब्ध आहे.

मुख्याध्यापकही लागले कामाला
शाळेचे नाव, वर्ग, पटसंख्या, कार्यरत शिक्षक, वर्गनिहाय व्हॅटस्अ‍ॅप गृप संख्या, व्हॅटअ‍ॅपद्वारे संपर्क साधता येणाºया शिक्षकांची संख्या, एसएमएस द्वारे संपर्क साधता येणाºया शिक्षकांची संख्या, मोबाईल नसणाºया शिक्षकांची संख्या आदी संदर्भात मुख्याध्यापकांना प्रथम पंचायत समिती, केंद्रप्रमुख तसेच शिक्षण विभागाला माहिती द्यावी लागणार आहे.

अनेकांकडून खोटी माहिती
शिक्षकांकडून पालकांना विचारणा केल्यानंतर अनेक पालक आपल्याकडे टीव्ही, रेडिओ, अ‍ॅन्ड्राईड मोबाईल नसल्याची खोटी माहिती देत असल्याचा प्रकारही सुरु आहे. माहिती खरी दिली, तर शासनाच्या योजनांपासून आपल्याला वंचित रहावे लागेल, अशी भीती पालकांना आहे. दरम्यान, पालक शिक्षकांना मोबाईलवर संपर्क करून शासनाच्या योजनांबद्दल माहिती सांगण्याचा तगादाही लावत असल्याचा प्रकारही ग्रामीण भागात बघायला मिळत आहे.

शासन योजनेपासून वंचित राहण्याची भीती
शिक्षकांकडून पालकांना विचारणा केल्यानंतर अनेक पालक आपल्याकडे टीव्ही, रेडिओ, अ‍ॅन्ड्राईड मोबाईल नसल्याची खोटी माहिती देत असल्याचा प्रकारही सुरु आहे. माहिती खरी दिली, तर शासनाच्या योजनांपासून आपल्याला वंचित रहावे लागेल, अशी भीती पालकांना आहे.

अनेकांचे दुर्लक्ष
शिक्षण विभागाने दिलेल्या आदेशानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना माहिती गोळा करणे सुरू केले आहे. विशेष म्हणजे, अनेकांनी मोबाईलवर पालकांसोबत संवाद साधत सर्व माहिती गोळा करून शिक्षण विभागाकडे सादर केली आहे. तर काहींनी अद्यापही दुर्लक्षच केले आहे.

विद्यार्थी तसेच पालकांना शिक्षणासंदर्भात घरच्या घरीच माहिती देता यावी, राज्यस्तरावरून येणारे कार्यक्रम त्यांना त्वरित कळावे, यासाठी पालकांकडील मोबाईलसंदर्भात माहिती गोळा करण्यात येत आहे. यामागील दुसरा कोणताही उद्देश नाही.
-दीपेंद्र लोखंडे,
शिक्षणाधिकारी, प्राथमिक जिल्हा परिषद चंद्रपूर

Web Title: Confusion among parents due to education department survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.