रस्ता बांधकामाची वरिष्ठांकडे तक्रार

By Admin | Updated: March 19, 2015 00:54 IST2015-03-19T00:54:15+5:302015-03-19T00:54:15+5:30

येथील ख्रिश्तानंद चौक ते शिवाजी चौकापर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचे काम मागील दोन महिन्यापासून सुरू आहे.

Complaint to road construction authority | रस्ता बांधकामाची वरिष्ठांकडे तक्रार

रस्ता बांधकामाची वरिष्ठांकडे तक्रार

ब्रह्मपुरी : येथील ख्रिश्तानंद चौक ते शिवाजी चौकापर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचे काम मागील दोन महिन्यापासून सुरू आहे. रुंदीकरण कामाचा कालावधी संपूनही जैसे थेच अवस्थेत असल्याने येथील व्यापारी व दुकानदारांनी वरिष्ठांकडे लेखी तक्रार दिली आहे.
राज्य महामार्ग क्र. २६८ ख्रिस्तानंद चौक ते रेल्वे क्रासींगपर्यंतचे रस्ता रुंदीकरणाचे काम २७ नोव्हेंबर २०१२ ला मंजूर झाले. रस्त्याच्या दुतर्फा ख्रिस्तानंद चौक ते शिवाजी चौकापर्यंत असलेल्या सर्व व्यावसायिकांनी रस्त्याच्या मध्यभागापासून १२ मीटरपर्यंतचे संपूर्ण अतिक्रमण काढून घेण्यासंबंधाने सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यावसायिकांना नोटीस बजावून अतिक्रमण काढून घेतले होते. तदनंतर प्रशांत कन्स्ट्रक्शन कंपनीने रस्त्याच्या एका बाजूला २ जानेवारीपासून खोदकाम करून ठेवले. १५ दिवसानंतर त्या खड्ड्यामध्ये गिट्टी टाकून पसरविण्यात आली. मात्र त्यानंतर सदर रस्त्याचे काम थंडबस्त्यात आहे. सदर कामाचा कालावधी संपूनही संबंधित विभागाने प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे खोदकाम केलेल्या रस्त्याचे बाजूला असलेल्या सर्व व्यापाऱ्यांनी तसेच फुटपाथ व्यावसायिकांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, यांच्याकडे तक्रार केली आहे. विशेष म्हणजे, काम प्रलंबित असल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे व्यावसायिकांच्या व्यवसायावरही परिणाम पडला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Complaint to road construction authority