ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 06:00 AM2019-12-04T06:00:00+5:302019-12-04T06:00:53+5:30

खरीप हंगामाच्या शेवटी आणि रब्बी हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यामध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकºयांवर दुबार पेरणी करण्याचे संकट आले होते. दरम्यान हरभरा, ज्वारी पिकावर लष्करी अळीचे संकट आले आहे. जिल्ह्यात खरीप हंगामातील गहू आणि हरभरा आणि काही प्रमाणात ज्वारी हे प्रमुख पीक आहे.

Cloudy weather has raised concerns for farmers | ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली

ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली

Next
ठळक मुद्देफवारणी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला : हरभरा, गहू, ज्वारी पिकांवर लष्करी अळीच्या आक्रमणाचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : रब्बी हंगामातील पेरणी बºयापैकी झाली असून ज्वारी, गृह, हरभरा पिक बहरात आले आहेत. मात्र दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्यामुळे पिकांवर विविध किडींचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे. त्यामुळे गरजेनुसार फवारणी करण्याचा सल्ला कृषी विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.
खरीप हंगामाच्या शेवटी आणि रब्बी हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यामध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याचे संकट आले होते. दरम्यान हरभरा, ज्वारी पिकावर लष्करी अळीचे संकट आले आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामातील गहू आणि हरभरा आणि काही प्रमाणात ज्वारी हे प्रमुख पीक आहे. पशुधनला चारा आणि धान्य या दोन्ही गरजा या पिकांमधून भागवल्या जातात. मात्र, या पिकावर लष्करी अळीचे संकट घोंगावत आहे. यामुळे शेतकºयांना पीक वाचवण्यासाठी फवारणी करावी लागणार आहे.
मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे ज्वारी, गहू, हरभरा पिकांवरील किडीचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे सुक्ष्म निरीक्षण करुन योग्य ते नियोजन करून फवारणी करणे गरजेचे आहे. पिकांवर किडीचा प्रादूर्भाव वाढल्यास कृषी विभागाचा सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

असे करा हरभरा, ज्वारी पिकाचे कीड नियंत्रण
हरभºयावर घाटी अळीचा प्रादूर्भाव दिसून आला तर ५ टक्के लिंबुळी अर्क, एक टक्के साबण चुरा किंवा बी.टी. जीवाणू पावडर, १ ते १.५ किलो प्रती हेक्टर किंवा लिंबोळी अर्क पाच टक्के, अन्डोसल्फान ३५ ई.सी. १० मिली किंवा क्रिनॉलफॉस २५ ईस.सी. २० मिली. किंवा फार्माथिअ‍ॅन २५ ईसी २० मिली किंवा ट्रावझोपआॅ ३५ टक्के, जाल्टामैथ्रीन १ टक्के २५ मिली किंवा ट्रायझोफॉस ३५ टक्के डेल्टामधील १ टक्के २५ मिली किंवा अन्डोसल्फान ३५ ईसी २० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यानंतर पिकाचे निरक्षण करावे गरजेनुसार फवारणी करावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
तूर पीक संकटात
सद्यास्थितीत पाने कुरतडणाºया अळीचा तूर पिकावर प्रादूर्भाव दिसून येत आहे. सततच्या धुक्यामुळे फुलांची गळती होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. दोन दिवसाआड वातावरणात बदल होत असल्याने तुरीचे पिक संकटात आले आहे. ढगाळ वातावरण व धुक्यामुळे फुल गळती, पाने कुरतडणारे कीटक वाढले आहेत. अचानक हवामान बदलून ढगाळ वातावरणामुळे सध्या बहरात आलेली तूर हातची जाण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी फुलांची मोठ्या प्रमाणात गळती होण्यास प्रारंभ झाला आहे. तसेच अळ्यांचा प्रादूर्भाव होण्यासाठी सुरुवात झाली आहे.
पाने गुंडाळणाऱ्या अळ्यांचा प्रादूर्भाव
अनेक ठिकाणी कोवळ्या शेंगा लागण्यास सुरुवात झाली आहे. मात्र तेथे पाने गुंडाळणाºया अळ्यांचा प्रभाव वाढला आहे. तसेच शेगांवर हल्ला चढविणाऱ्या अळ्यांचे प्रमाण वाढले आहे. यावर नियंत्रण न आल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

शुक्रवारपर्यंत ढगाळ वातावरण
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार शुक्रवारपर्यंत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकºयांनी पिकांचे निरीक्षण व गरजेप्रमाणे फवारणी करणे आवश्यक आहे.
लष्करी अळीला प्रतिबंध
लष्करी अळीचा प्रादूर्भाव ज्वारी या पिकावर देखील झाला आहे. त्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी श्ेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यात लिंबोळी अर्क पाच टक्के ५० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
लष्करी अळीची वाढ दुसऱ्या व तीसऱ्या टप्प्यात असेल तर इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के डब्ल्युअजी ४ ग्रॅम किंवा स्पिनोसॅड ४५ टक्के एससी ३ मिली अथवा धावमिथॉक्सझाम १२.६ टक्के लॅगडा सॉहलोब्रिन ९.५ टक्के, क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५ टक्के एससी ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी.
योग्य पद्धतीने फवारणी केल्यास लष्करीअळीचा प्रादूर्भाव कमी होतो. यासाठी पिकांवर बारीक नजर ठेवणे आवश्यक असल्याची माहिती कृषी तज्ज्ञांनी दिली.

Web Title: Cloudy weather has raised concerns for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.