शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांनी जगविले १२ हजार चंदन वृक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:00 IST

२०१६ रोजी हरित मित्र परिवारातील सदस्यांना लातूर जिल्ह्यातील हैसूर येथील एका शेतकºयाने मोठ्या प्रमाणात चंदन वृक्षाची लागवड केल्याची माहिती वृत्तपत्रातून मिळाली होती. सदस्यांनी त्या गावात भेट देवून शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. वरोरा परिसरात आल्यानंतर चंदन वृक्षलागवडीबाबत जनजागृती सुरू केली.

ठळक मुद्देहरित मित्र परिवारचे पाठबळ : चंदन वृक्ष संगोपनावर येतो अल्प खर्च

प्रवीण खिरटकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : चार वर्षांपासून शहरातील हरित मित्र परिवाराने परिसरात चंदनवृक्ष लावण्याकरिता जनजागृती सुरू केली. वृक्षरोपणाचे महत्त्व ओळखून नागरिक व शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिल्याने १२ हजार चंदनाची वृक्ष अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. यापूर्वी शहरात एकही चंदन वृक्ष नव्हता हे विशेष.२०१६ रोजी हरित मित्र परिवारातील सदस्यांना लातूर जिल्ह्यातील हैसूर येथील एका शेतकºयाने मोठ्या प्रमाणात चंदन वृक्षाची लागवड केल्याची माहिती वृत्तपत्रातून मिळाली होती. सदस्यांनी त्या गावात भेट देवून शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. वरोरा परिसरात आल्यानंतर चंदन वृक्षलागवडीबाबत जनजागृती सुरू केली. चंदन वृक्ष लावताना हरित मित्र परिसराचे सदस्य स्वत: जावून मदत करतात. चंदनाचे रोपटे लावताना त्याच्या सभोताल तुरीचे दाणे किंवा पपईचे बियाणे टाकले जाते. चंदन रोपटे काही दिवस स्वत: अन्न घेवू शकत नाही. त्यामुळे चंदन वृक्षाला सभोवताल तूर व पपईपासून अन्न घेण्यास मदत होते. सातत्याने जनजागृती केल्याने चार वर्षांत १२ हजार चंदनाचे वृक्ष जगले आहेत. काही झाडांची उंची ३५ फुटाहून अधिक झालीआहे. जिल्ह्याचे तापमान उष्ण असल्याने चंदन वृक्षाची वाढ झपाट्याने होते. काही शेतकºयांनी चंदन वृक्ष बांधावर लावले. त्यांचीही वाढ मोठ्या झपाट्याने झाल्याची माहिती हरित मित्र परिवाराच्या सदस्यांनी दिली.१५ वर्षांनंतर होतो मोठा आर्थिक लाभचंदन वृक्षांचे वेळोवेळी संगोपन करण्याची गरज नाही. चंदनाचे रोपटे लावल्यानंतर दोन उन्हाळ्यात काळजी घेवून पाणी दिल्यास जिवंत राहते. वाढही झपाट्याने होते. १५ वर्षांनंतर मोठा आर्थिक लाभ होतो. संगोपनावर अधिक खर्च नसल्याने अनेक व्यक्ती चंदनाचे वृक्ष लावत आहे. वरोरा परिसरात येत्या काही दिवसात चंदन वृक्ष लागवडीचे क्षेत्र वाढणार आहे.शेतकऱ्यांनी चंदन वृक्ष शेतीच्या बांधावर लावून दोन वर्षे काळजी घेतल्यास मोठा आर्थिक लाभ होतो. बाजारात चंदन वृक्षाला मागणी आहे. त्यामुळे पारंपरिक शेतीपेक्षा काळानुसार आज विचार बदलविण्याची गरज आहे.- किशोर उत्तरवार,हरित मित्र, परिवार

टॅग्स :agricultureशेती