शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ मुलांच्या वाट्याला अचानक आले पोरकेपण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 05:00 IST

अचानक मागील वर्षी पोळ्याला मालूचा मृत्यू झाल्याने सुधाकरवर आभाळ कोसळले. कसाबसा दोन मुलांचा सांभाळ करीत असतानाच ऐन दिवाळीत १३ नोव्हेंबरला सुधाकरचा शेतात सोलर वीज प्रवाहाचा करंट लागून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे साडेतीन वर्षांचा नैतिक व १८ महिन्यांचा कार्तिक आई वडिलाच्या मायेपासून पोरके झाले आहेत. 

ठळक मुद्देपंधरा महिन्यांच्या फरकाने आई,वडिलांचा मृत्यू

  राजकुमार चुनारकर    लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूरपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या बेलारा या आदिवासी गावात  मालुताई व प्रमोद रामचंद्र जीवतोडे यांचा सुरळीत संसार सुरू होता. नैतिक व कार्तिक नामक दोन अपत्ये झाली. अचानक मागील वर्षी पोळ्याला मालूचा मृत्यू झाल्याने सुधाकरवर आभाळ कोसळले. कसाबसा दोन मुलांचा सांभाळ करीत असतानाच ऐन दिवाळीत १३ नोव्हेंबरला सुधाकरचा शेतात सोलर वीज प्रवाहाचा करंट लागून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे साडेतीन वर्षांचा नैतिक व १८ महिन्यांचा कार्तिक आई वडिलाच्या मायेपासून पोरके झाले आहेत. चिमूर तालुक्यातील बेलारा या गावातील प्रमोद रामचंद्र जीवतोडे  यांची पत्नी मालू हिचा पंधरा महिन्यांपूर्वी मृत्यू झाला तर प्रमोद जीवतोडे याचा दिवाळीच्या दिवशी सोलर मशीनच्या तारात पाय गुंडाळल्याने मृत्यू झाला. ज्या वयात बालकाला मातृत्वाची व पितृत्वाची आवश्यकता होती. त्याच वयात या दोन निरागस भावंडावर पहिले गुरू म्हणून जीवनाचे बाळकडू शिकवण्याची वेळ होती, त्याच वयात या दोन्ही भावंडांना आई वडिलांच्या मायपासून पोरके होण्याची वेळ आली आहे. आई-वडिलांच्या अकाली जाण्याने नैतिक व कार्तिकची जबाबदारी म्हाताऱ्या मंजुळाबाई व रामचंद्र जीवतोडे या आजी-आजोबावर आली आहे.  

बातमी वाचून केली मदतचंद्रपूर येथील बिनबा गेट परिसरातील प्रवीण कुलथे यांनी आईपाठोपाठ वडिलाचाही मृत्यू झाला, या आशयाची बातमी लोकमतमध्ये वाचली. त्यानंतर त्यांनी दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजी न करता त्याऐवजी बेलारा येथे जाऊन कार्तिक व नैतिक यांना ११ हजार रुपयांची मदत केली. कुलथे यांचा मित्र जावेद यानेही चार हजार रुपयांची मदत केली. 

टॅग्स :Deathमृत्यू