शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खतांमुळे जमिनीची सुपिकता ढासळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:01 IST

जमिनीची सुपिकता ही माती परीक्षातून ठरविली जाते. माती परीक्षणावरून प्रयोगशाळेत जमिनीचे विविध भौतिक, रासायनिक, गुणधर्म तपासले जातात. जलधारण क्षमता, आकार घनता, जमिनीचा पोत, ओलाव्याचे प्रमाण तर रासायनिक गुणधर्मात सामु, क्षारता, सेंद्रीय कर्ब, उपलब्ध स्फुरद व पालाश युक्त कॅल्शीयम व मॅग्नेशीयम, चुना, तांबे, लोह, जस्ताचे प्रमाण तपासले जातात.

ठळक मुद्देपिकांची फेरपालट करणे गरजेचे आहे : अधिकाधिक शेतकऱ्यांनी द्यावी सेंद्रीय खताला पसंती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेत जमिनीची खोली, मातीच्या कणांची रचना, निचरा, भुसभुशीतपणा, उपलब्ध दुय्यम आणि सुक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाण, सुक्ष्म जिवाणूंची संख्या आदींवर जमिनीची सुपिकता अवलंबून असते. जमिनीचा पोत व जडण-घडण यावरच जमिनीचा पोत अवलंबून असते. मात्र उत्पादनासाठी रासायानिक खतांचा मोठ्या प्रमाणात होत असलेला वापर तसेच सेंद्रीय खतांची कमतरता यामुळे जमिनीचा ºहास होत आहे. परिणामी जिल्ह्यातील जमिनीची सुपिकता दरवर्षी ढासळत आहे.जमिनीची सुपिकता ही माती परीक्षातून ठरविली जाते. माती परीक्षणावरून प्रयोगशाळेत जमिनीचे विविध भौतिक, रासायनिक, गुणधर्म तपासले जातात. जलधारण क्षमता, आकार घनता, जमिनीचा पोत, ओलाव्याचे प्रमाण तर रासायनिक गुणधर्मात सामु, क्षारता, सेंद्रीय कर्ब, उपलब्ध स्फुरद व पालाश युक्त कॅल्शीयम व मॅग्नेशीयम, चुना, तांबे, लोह, जस्ताचे प्रमाण तपासले जातात. मात्र जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी मृदा तपासणी न करताच पेरणी करतात. परिणामी अनेकवेळा नुकसानीला जामोरे जावे लागते.दरवर्षी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मृदा तपासणी करण्याचे आवाहन केले जाते. यावर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माती परिक्षणासाठी अत्यल्प नमूने प्रयोगशाळेत आले आहे. जमीन ही एक सजीव संस्था आहे. यात अनेक सुक्ष्म जीवजंतू (जीवाणू, बुरशी व इतर सुक्ष्म सजीव घटक) व प्राणी (गांडुळ) यांचा अधिवास असतोे. जमिनीस जैविक गुणधर्म प्राप्त होतात. तर जमिनीत असलेल्या खनिजामुळे व भौगोलिक घटकांमुळे जमिनीला भौतिक व रासायनिक गुणधर्म (जमिनीचा सामू, क्षारता, सेंद्रीय कर्ब आणि चुनखडीचे प्रमाण) प्राप्त होते. त्यामुळे प्रत्येकवर्षी शेतकºयांनी माती परिक्षण करून त्यानुसार द्रव्याचे प्रमाण कमी-अधिक करून पेरणी केल्यास उत्पादनात निश्चितच भर पडेल, असे मत कृषीतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, यावर्षी खरीप हंगाम कोरोनाच्या संकटात अडकल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी परीक्षण न करताच पेरणी आटोपली.उत्पादनात वाढ होण्यासाठी नैसर्गिक घटक आवश्यकमृदेमध्ये ४५ टक्के रासायनिक पदार्थ, ५ टक्के सेंद्रीय पदार्थ, २५ टक्के पाणी व २५ टक्के हवा हे घटक असतात. या घटकांचे प्रमाण योग्य राहिल्यास कृषी उत्पादनात वाढ व सातत्य राखण्यास शक्य होणार आहे.मृदा तयार होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.संतुलित खतांचे वापरअसंतुलित खत वापराने जमिनीचे आरोग्य बिघडत असून अशा जमिनीमध्ये सेंद्रीय पदार्थांचा वापर अधिक प्रमाणात करणे आवश्यक आहे. उत्पादन वाढीसाठी संकरित व अधिक उत्पादनक्षम जातींच्या बियाणांचा वापर वाढला आहे.जमिनीच्या आरोग्याची गुरूकिल्ली सामूजमिनीचा सामू सात असल्यास जमीन उदासीन प्रकारात मोडते. सातपेक्षा कमी असेल तर आम्लधर्मी व सातपेक्षा जास्त असल्यास विम्लधर्मी. सर्वसाधारणपणे ६.५ ते ७.५ या दरम्यान सामू असल्यास पिकांना योग्य अन्नद्रव्ये जमिनीत मिळतात

टॅग्स :agricultureशेती