धूळ प्रदूषणामुळे चंद्रपूरकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 06:00 AM2019-12-05T06:00:00+5:302019-12-05T06:00:33+5:30

राज्यात चंद्रपूर जिल्ह्याचा प्रदूषणामध्ये वरचा क्रमांक आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्या प्रश्न उभा ठाकला असतानाच आता रस्त्यांच्या कामामुळे होणाऱ्या धुळीचा त्रासही नागरिकांना सहन करावा लागत आहे. येथील नागपूर रोड पाण्याच्या टाकीपासून तर वरोरा नाकाचौकापर्यंत रस्ता खोदण्यात आला आहे. त्यातच वरोरा नाका उड्डाण पुलाचे कामही सुरु आहे.

 Chandrapurkar suffers from dust pollution | धूळ प्रदूषणामुळे चंद्रपूरकर त्रस्त

धूळ प्रदूषणामुळे चंद्रपूरकर त्रस्त

Next
ठळक मुद्देजागोजागी रस्त्यांचे खोदकाम : नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न कायम

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : प्रदूषणामध्ये अव्वल असलेल्या चंद्रपुरातील नागरिकांना सध्या रस्त्यांच्या खोदकामामुळे होणाऱ्या धुळीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या रस्त्यांचे काम त्वरित करून या धुळीपासून मुक्तता करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
राज्यात चंद्रपूर जिल्ह्याचा प्रदूषणामध्ये वरचा क्रमांक आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्या प्रश्न उभा ठाकला असतानाच आता रस्त्यांच्या कामामुळे होणाºया धुळीचा त्रासही नागरिकांना सहन करावा लागत आहे. येथील नागपूर रोड पाण्याच्या टाकीपासून तर वरोरा नाकाचौकापर्यंत रस्ता खोदण्यात आला आहे. त्यातच वरोरा नाका उड्डाण पुलाचे कामही सुरु आहे. त्यामुळे या रस्त्यावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य आहे. या रस्त्याबरोबरच आंबेडकर महाविद्यालय ते सिंधी पंचायतपर्यंत रस्त्याचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे या रस्त्यावरही सर्वत्र धुळीचे साम्राज्य आहे. धुळीमुळे या परिसरातील नागरिक अशरक्ष: या रस्त्याच्या कामाला कंटाळले आहे. चंद्रपूर-मूल मार्गावरील बंगाली कॅम्प ते सावरकर चौकापर्यंतही काम सुरु आहे.

चंद्रपूर शहरातील विविध भागात सुरु असलेल्या रस्ता बांधकामामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य आहे. त्यामुळे अनेकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. लहान बालके तसेच विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे बांधकाम परिसरातील रस्त्यांवर किमान पाणी शिंपडावे. जेणेकरून धुळीचे प्रमाण काही प्रमाणात का, होईना कमी होईल.
- सतीश चहारे, चंद्रपूर
विकास कामे करा, मात्र त्या कामामध्ये गती हवी. जागोजागी रस्ते खोदण्यात आले आहे. मात्र पाहिजे त्या प्रमाणात कामाला गती नाही. त्यामुळे शहरातील रस्त्यांचे कामे त्वरित करून दिलासा देणे गरजेचे आहे.
-बंडू लोहट, स्थानिक नागरिक चंद्रपूर

वॉर्डावॉर्डातही धूळ
चंद्रपूर शहरात विविध विकास कामे सुरु आहे. कुठे सिमेंट रोड तर कुठे नाल्यांचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे जागोजागी रस्त्याचे खोदकाम सुरु आहे.परिणामी सर्वत्र धुळीचे साम्राज्य आहे. विशेष म्हणजे, दिवसभर काम सुरु राहत असल्याने जाण्यायेण्यासाठीही मोठी अडचण निर्माण होत आहे.

Web Title:  Chandrapurkar suffers from dust pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.