शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

स्वाध्याय योजनेत चंद्रपूर राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:41 IST

चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेने पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय स्टुटंड व्हाॅट्स ॲप ...

चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेने पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय स्टुटंड व्हाॅट्स ॲप बेस्ट डिजिटल होम असायमेंट योजना सुरु केली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासोबत जोडून ठेवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. दरम्यान, राज्यात चंद्रपूर जिल्हा सर्वाधिक म्हणजेच ५६ हजार ९४२ विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवित प्रथम क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या स्थानावर सातारा जिल्ह्याचा क्रमांक आहे.

कोरोनामुळे यावर्षी शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थी मागे पडू नये, ते अभ्यासक्रमासोबत जोडून रहावे यासाठी संपर्क आणि संवादाचे माध्यम म्हणून व्हाॅट्स ॲप वापरून सरावासाठी स्वाध्याय उपक्रम करून देण्यात आला आहे. या माध्यमातून पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना फोनवर क्विझ ( प्रश्नमंजुषा) घरच्या घरी उपक्रम करून देण्यात येत आहेत. यासाठी येथील जिल्हा परिषदषेचे मुख्यकार्यपालन अधिकारी राहुल कर्डिले, तसेच डायटचे प्राचार्य धनंजय चाफले यांनी विशेष प्रयत्न करून अधिकाधिक विद्यार्थ्यांना जोडण्याचा प्रयत्न केला. याचाच फायदा झाला असून चंद्रपूर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आला आहे. तर सातारा दुसऱ्या तसेच कोल्हापूर जिल्हा तिसऱ्या स्थानावर आहे.

बाॅक्स

दर शनिवारी सराव

या उपक्रमांतर्गत दर शनिवारी विद्यार्थ्यांना व्हॅाट्स ॲपवर प्रश्न पाठविले जात असून त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकली जात आहे. विशेष म्हणजे, तत्काळ प्रश्नाचे उत्तर बरोबर की, चुक हे आणि गुण दर्शविल्या जात असल्याने विद्यार्थी आवडीने हे प्रश्न सोडवित आहे. विशेष म्हणजे, दुर्गम भागातील तालुक्यातील विद्यार्थ्यांनीही यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला आहे.

कोट

या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना अधिकाधिक फायदा व्हावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. शिक्षक, केंद्रप्रमुख, डायट प्राचार्यांनी परिश्रम घेतले. त्यामुळे आजघडीला ५६ हजार विद्यार्थी लाभ घेत आहेत. यानंतरही सर्वांच्या प्रयत्नामुळे ही संख्या आणखी वाढेल, असा विश्वास आहे.

-राहुल कर्डिले

मुख्य कार्यपालन अधिकारी, चंद्रपूर