शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पूरपरिस्थितीत जीव मुठीत घेऊन जगतात गावकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 05:00 IST

जेव्हा जेव्हा महापूर आले आहेत, तेव्हा तेव्हा येथील जनता खूप भयभीत झाली आहे.  पूरपरिस्थितीत येथील गावकरी जीव मुठीत घेऊन राहतात. चहुबाजूंनी गावाला पुराचा वेढा असतो.  १९९४ पासून येथील ग्रामस्थ पुनर्वसनाची मागणी घेऊन शासन प्रशासनाचा दरवाजा ठोठावत आहेत. यासाठी पुनर्वसन संघर्ष समितीची गावकऱ्यांनी स्थापना करून वेळोवेळी या समितीच्या माध्यमातून गावकरी पुनर्वसनाची मागणी रेटून धरत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी :  ब्रम्हपुरी तालुक्यातील मौजा मांगली गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या गावाला पुराचा फटका वारंवार बसला आहे. पूरपरिस्थितीत जीव मुठीत घेऊन गावकऱ्यांना जगावे लागत आहे. त्यामुळे गावाचे पुनर्वसन हाच उपाय आहे.जेव्हा जेव्हा महापूर आले आहेत, तेव्हा तेव्हा येथील जनता खूप भयभीत झाली आहे.  पूरपरिस्थितीत येथील गावकरी जीव मुठीत घेऊन राहतात. चहुबाजूंनी गावाला पुराचा वेढा असतो.  १९९४ पासून येथील ग्रामस्थ पुनर्वसनाची मागणी घेऊन शासन प्रशासनाचा दरवाजा ठोठावत आहेत. यासाठी पुनर्वसन संघर्ष समितीची गावकऱ्यांनी स्थापना करून वेळोवेळी या समितीच्या माध्यमातून गावकरी पुनर्वसनाची मागणी रेटून धरत आहेत. नुकताच या विषयाचे एक निवेदन राज्याचे मदत व पुनर्वसन व्यवस्थापन मंत्री तथा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना गावकऱ्यांनी दिले आहे. बऱ्याचवेळा उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना  गावाच्या पुनर्वसनाबाबत निवेदने सादर करण्यात आली आहेत. येथील जनता विशेषकरून १९९४ पासून सातत्याने शासन प्रशासनाला ही मागणी करत आली आहे. या खात्याचे मंत्री ना.वडेट्टीवार असल्याने गावकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यावेळी प्रभाकर सेलोकर,  पुनर्वसन संघर्ष समितीचे अध्यक्ष गोकुलदास कार, उपसरपंच भावेश दोनाडकर, देवीदास लिंगायत, नानाजी मुंडरे, आंबेवडेकर बनकर, देवाजी कामडी, खुशाल सोंडवले, संजय बिंजवेसह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.                   

अनेकदा आलेल्या पुरामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीसन १९९४, २००५, २००७, २०२१ या वर्षात आलेल्या पुरामुळे गावकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. येथे ३०० घरांची वस्ती असून १२०० - १४०० च्या आसपास लोकसंख्या आहे. गावाला पुराचा वेढा निर्माण होतो. बाहेर निघण्याचा कोणताही मार्ग नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे.

सन १९९४ पासून अनेकदा गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी शासनाकडे वारंवार करण्यात आली आहे. फक्त गावाचे पुनर्वसन दोन-चार कि.मी. अंतरावर करण्यात यावे, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. पुनर्वसन मंत्री आपले आमदार आहेत. त्यांनी जातीने लक्ष घालून मांगलीचे पुनर्वसन करावे.- गोकूळ कार, सरपंच, मांगली ता. ब्रम्हपुरी, 

 

टॅग्स :floodपूरgram panchayatग्राम पंचायत