शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाच्या चाकासह अपघातावरही ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:01 IST

२२ मार्चला जनता कर्फ्यू झाल्यानंतर २३ मार्चपासून लॉकडाऊनला सुरूवात झाली देशभरात हा लॉकडाऊ न ३१ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मागील आठवड्यापासून लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे काही वाहनांची थोडीफार वर्दळ सुरू झाली आहे.

ठळक मुद्देएप्रिल महिन्यात जिल्हाभरात केवळ १२ अपघात : गतवर्षीच्या तुलनेत संख्या घटली

परिमल डोहणे।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे सर्वच ठप्प आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता जिल्ह्यातील वाहतूक पूर्णपणे बंद होती. या लॉकडाऊनमध्ये वाहनांची चाके थांबल्याने अपघातही थांबल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. एप्रिल महिन्यात संपूर्ण जिल्ह्यात केवळ १२ अपघातांची नोंद आहे. गतवर्षीच्या तुलनेत अपघातांची संख्या घटल्याचे चित्र आहे.२२ मार्चला जनता कर्फ्यू झाल्यानंतर २३ मार्चपासून लॉकडाऊनला सुरूवात झाली देशभरात हा लॉकडाऊ न ३१ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मागील आठवड्यापासून लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे काही वाहनांची थोडीफार वर्दळ सुरू झाली आहे. मात्र ४ मे पूर्वी अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त सर्वच वाहने थांबली होती. त्याचा एका बाजूने सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.गतवर्षी एप्रिल महिन्यात जिल्हाभरात ५७ अपघातांची नोंद झाली होती. यामध्ये २७ जणांचा मृत्यू तर ४३ जण गंभीर जखमी झाले होते. यावर्षीचा संपूर्ण एप्रिल महिना लॉकडाऊनमध्येच गेला. त्यामुळे यावर्षी एप्रिलमध्ये केवळ १२ अपघात झाले असून ४ जणांचा मृत्यू झाला तर ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. गतवर्षीच्या मार्च आणि एप्रिल महिन्यातील आकडेवारी पाहता यावर्षी अपघात, त्यातील मृत आणि जखमीची संख्या कमालीची घटल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊ न शिथील केल्यानंतर आता वाहने रस्त्यावर धावत आहेत. मात्र त्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी आणि रस्त्यावरील वर्दळ कमी होऊन अपघातावरही ब्रेक लागला आहे.ब्लॅक स्पॉटही झाले अपघातविरहितएखाद्या ठिकाणी वारंवार अपघात होणे, त्यात चारपेक्षा अधिक नागरिकांचा जीव जाणे असे जिल्ह्यात सुमारे २८ ब्लॅक स्पॉट आहेत. या ठिकाणी प्रशासनातर्फे जनजागृती फलकही लावण्यात आले आहेत. मात्र २३ मार्च ते १८ मे या कालावधीत वाहतूक निरीक्षक कार्यालयातून मिळालेल्या माहितीतून अत्यल्प अपघात झाले आहेत. लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तूचे वाहन वगळता एकही वाहन धावले नाही. लालपरीसुद्धा बंद होती. परिणामी रस्त्यावरील वर्दळ शांत होती. याचा फायदा मोठ्या प्रमाणात झाला असून अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे.लॉकडाऊनच्या काळात अपघाताचे प्रमाण अत्यल्प आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना वाहन खरेदी करुन देतानाच वाहतूक नियमांचे पालन करुन वाहन चालविण्याच्या सूचना कराव्या, अनेकदा युवक वाहनावरच मोबाईलद्वारे संभाषण करुन गाडी चालवताना दिसतात. त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे. पालकांनीसुद्धा पाल्यांना समज द्यावी.-हृदयनाथ यादव,वाहतूक निरीक्षक, चंद्रपूर

टॅग्स :Accidentअपघात