शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

भाजप व मित्र पक्षाचे वर्चस्व

By admin | Updated: October 4, 2014 23:23 IST

जिल्हा परिषद सभापतिपदासाठी शनिवारी पार पडलेल्या विशेष सभेत भाजपा व मित्र पक्षाने चारही सभापतिपदावर ताबा मिळविला असून यात दोन भाजपाचे तर, शिवसेना, शेतकरी संघटनेने प्रत्येकीे

जि.प. सभापती निवडणूक : भाजपाला दोन तर सेना, संघटनेला प्रत्येकी एक सभापतिपदचंद्रपूर: जिल्हा परिषद सभापतिपदासाठी शनिवारी पार पडलेल्या विशेष सभेत भाजपा व मित्र पक्षाने चारही सभापतिपदावर ताबा मिळविला असून यात दोन भाजपाचे तर, शिवसेना, शेतकरी संघटनेने प्रत्येकीे एका पदावर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. यात शेतकरी संघटनेचे नीळकंठ कोरांगे यांची समाजकल्याण सभापती तर शिवसेनेच्या सरिता नीलकंठ कुडे यांना महिला व बालकल्याण समिती सभापतिपद मिळाले. भाजपाचे देवराव भोंगळे, भाजपा समर्थित युवाशक्ती संघटनेचे ईश्वर मेश्राम यांचीही सभापतिपदासाठी निवड करण्यात आली आहे. मात्र या दोघांना अद्यापही खाते देण्यात आले नाही. बांधकाम सभापतिपद देवराव भोंगळे यांच्याकडे तर, कृषी सभापती म्हणून ईश्वर मेश्राम यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.शनिवारी पार पडलेल्या सभापतीच्या निवडणुकीदरम्यान काँग्रेसचे चार, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन सदस्य अनुपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्या सरिता कुडे यांना २९ मते पडले तर अन्य सदस्यांना २८ मते मिळाली.विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत गुरु यांनी कुडे यांना आपले मत दिल्याने त्यांना २९ मते मिळाल्याची माहिती मिळाली आहे. सभापतिपदासाठी निवडणूक रिंगणात असलेले काँग्रेसचे अविनाश जाधव यांना २० , दिनेश चिटणूरवार यांना १८, पंकज पवार यांना ८, अमर बोडलावार यांना ४ मतांवर समाधान मानावे लागले. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाने शिवसेना, शेतकरी संघटना, मनसे, युवाशक्ती संघटनेसोबत युती केली. तसेच राष्ट्रवादीच्या एका सदस्याला आपल्या गोठात आणून सत्ता मिळवीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यात यश मिळविले. काँग्रेसकडे २१ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सात सदस्य असे एकूण २८ सदस्य होते. त्यांना सत्ता मिळविण्यासाठी केवळ एका सदस्याची गरज असतानाही ते मिळविता आला नाही. एवढेच नाही तर, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सदस्य फोडण्यास भाजपाला यश आले आणि जिल्हा परिषदेमध्ये सत्ता मिळविली. (नगर प्रतिनिधी)