शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

विसापूर येथे भोई समाजाचा मोर्चा

By admin | Updated: October 2, 2016 00:51 IST

तालुक्यातील विसापूर येथे समाजबांधव मच्छिमारीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात.

शेकडोंची उपस्थिती : मासे उत्पादनासाठी तलावाची मागणी बल्लारपूर : तालुक्यातील विसापूर येथे समाजबांधव मच्छिमारीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. परंतु गावात तलाव नसल्याने अडचणीला सामोरे जावे लागते. उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे मूकमोर्चा काढण्यात आला. गावातील क्रीडांगण तलाव मच्छी उत्पादन घेण्यासाठी देण्यात यावा, या मागणीला अनुसरुन येथील भोई समाज सेवा संघातर्फे सरपंच रिता जिलटे व ग्रामविकास अधिकारी एल.वाय. पोबरे यांना निवेदन देण्यात आले.चंद्रपूर जिल्हा भोई समाज सेवासंघ शाखा विसापूरच्या वतीने ग्रामपंचायतीला निवेदन सादर करण्यापूर्वी समाज बाधवांचा मूकमोर्चा राजू लांडगे यांच्या नेतृत्त्वात काढण्यात आला. त्यामध्ये शेकडोंवर समाज बांधव सहभागी झाले. त्यानंतर ग्रामपंचायत समोर पटांगणावर सभा घेण्यात आली.विसापूर येथील भोई समाज मोठ्या संख्येत आहे. समाज बांधवाकडे उत्पादनाचे कोणतेही साधन नाही. परिणामी समाज दारिद्रयात आहे. गावातील शिवाजी चौक लगत तलाव होता. परंतु कित्येक वर्षांपासून क्रीडांगण होणार म्हणून सांगितले जात होते. मात्र अद्यापही त्या ठिकाणी क्रीडा संकूल उभारण्यात आले नाही. यामुळे सदर तलावाचे खोलीकरण करून भोई समाजाला शिंगाडा शेती व मत्स्यपालन व्यवसाय करण्यास उपलब्ध करून देण्याची मागणी राजू लांडगे यांनी केली. ग्रामपंचायतीने मत्स्यव्यवसाय करणाऱ्यांसाठी ओटे बांधून मत्स्यबाजारासाठी जागा देण्याची आग्रही मागणी निवेदनातून केली. येथील सरपंच रिता जिलटे यांना निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात विसापूर भोई समाज सेवासंघाचे दौलत पारशिवे, ऋषी पारशिवे, प्रमोद पचारे, प्रदीप लांडगे, महिला आघाडीच्या विजया मारबते, पार्वता पारशिवे, निलीमा दाते, शीतल इंगोले, सुवर्णा मांढरे, चित्रा नान्हे, अ‍ॅड. मनोज पारशिवे, दिलीप नान्हे आदींचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)