शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! संपर्कातून वाढताहेत कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 05:01 IST

राजुरा आणि गडचांदूर भागात अधिक बाधित पुढे आल्यामुळे या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. याशिवाय राजुरा येथील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी राजुरा येथे डेडिकेटेड हेल्थ कोविड केअर स्थापन करून जिवती, कोरपना व गडचांदूर येथील नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी त्यांनी या ठिकाणच्या उपजिल्हा रुग्णालयातील व्यवस्थेची पाहणी केली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : राजुऱ्यात डेडिकेटेड हेल्थ कोविड सेंटर सुरु करा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात संपर्कातून बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शारीरिक अंतर, मास्क वापरणे, अत्यावश्यक कामाशिवाय घरातून बाहेर न पडणे पुढचा काही काळ आवश्यक आहे. लॉकडाऊनला ज्यापद्धतीने प्रतिसाद नागरिक देत आहे. त्याच पद्धतीने शासनाच्या सर्व निर्देशांचे पालन केल्यास कोरोना सोबत लढणे शक्य होईल, असे मत जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी व्यक्त केले.राजुरा आणि गडचांदूर भागात अधिक बाधित पुढे आल्यामुळे या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. याशिवाय राजुरा येथील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी राजुरा येथे डेडिकेटेड हेल्थ कोविड केअर स्थापन करून जिवती, कोरपना व गडचांदूर येथील नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी त्यांनी या ठिकाणच्या उपजिल्हा रुग्णालयातील व्यवस्थेची पाहणी केली. प्रत्येक गाव, प्रत्येक शहर आता या आजारातून बाहेर काढणे आवश्यक असून त्यासाठी नागरिकांचे सहकार्य मिळेल, असे प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन केले. त्यानंतर त्यांनी गडचांदूर येथे भेट दिली. आढावा बैठकीत सीईओ राहुल कर्डिले, नगराध्यक्ष सविता टेकाम, उपाध्यक्ष शरद जोगी, सभापती विक्रम येरणे, उपविभागीय अधिकारी जे.पी. लोंढे, तहसीलदार महेंद्र वाकलेकर, मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी, पोलीस निरीक्षक भारती, डॉ. स्वप्निल टेंभे, माजी सभापती निमजे, नगरसेवका पोन्नमवार आदी उपस्थित होते.४ हजार किट महानगरपालिकेकडेजिल्ह्यामध्ये २१ जुलै रोजी १० हजार अँंन्टिजेन चाचण्यांच्या किट दाखल झाल्या आहेत. यापैकी ४ हजार किट महानगरपालिकेला देण्यात आल्या आहेत. लॉकडाऊननंतरही अँंन्टिजेन चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील मोठे उद्योग, कारखाने या ठिकाणी जाऊन अँंन्टिजेन चाचणी होणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील उद्योग, कारखाने, संस्थेतील नागरिकांची अँंन्टिजेन तपासणी करायची असल्यास जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासनाला कळविणे गरजेचे आहे.जबाबदारी वाढणारलॉकडाऊनला प्रतिसाद मिळत असून शहरातील बाधितांची संख्या कमी झालेली आहे. लॉकडाऊनचे यश नागरिकांवर अवलंबून आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर नागरिकांची जबाबदारी वाढणार आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडावे, विनाकारण गर्दी करू नये, मास्क योग्य पद्धतीने वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे या महत्त्वपूर्ण गोष्टीचे पालन करणे गरजेचे आहे.चाचण्यांचे प्रमाण वाढविले२१ जुलैपर्यंत १ हजार १८२ इतक्या अ‍ॅन्टिजेन चाचण्या केलेल्या आहेत. या अ‍ॅन्टिजेन चाचण्यांमधून ५ कोरोना बाधित पुढे आलेले आहेत. तसेच यामधील २५ स्वॅब प्रयोगशाळेमध्ये पुढील तपासणीसाठी पाठविले आहे. अ‍ॅन्टिजेन चाचण्यांमुळे कोरोना तपासणीचे प्रमाण वाढले आहे. एकट्या चंद्रपूर शहरामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये ८०० पेक्षा अधिक अ‍ॅन्टिजेन तपासणी झालेल्या आहेत.बरे होण्याचा दर ६० टक्केजिल्ह्यामध्ये आतापर्यंत आरटीपीसीआरच्या माध्यमातून प्रयोगशाळेत १३ हजार ३७२ स्वॅब तपासण्यात आलेले आहे. बाधितांच्या संख्येमध्ये घट करायची असेल तर लॉकडाऊनच्या काळामध्ये जी काळजी घेतली आहे, तीच काळजी पुढील काळात घेणे गरजेचे आहे. दाखल झालेल्या बाधितांपैकी ६० टक्केच्या वर जिल्ह्याचा रिकवरी दर आहे. जिल्ह्यात एकाही बाधितांचा मृत्यू झालेला नाही.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या