शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लस देण्यासाठी जिल्ह्यात अडीच हजारांवर कर्मचाऱ्यांची फौज तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:56 IST

चंद्रपूर : कोरोना संसर्गावर प्रतिबंधात्मक लस लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही लस आलीच तर ती प्रत्येक नागरिकांपर्यंत ...

चंद्रपूर : कोरोना संसर्गावर प्रतिबंधात्मक लस लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही लस आलीच तर ती प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचेल, यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने नियोजन केले आहे. यासाठी जिल्ह्यात सुमारे अडीच हजारांवर कर्मचाºयांची फौज तयार केली जात आहे.

लसीकरणासाठी तयार होत असलेल्या पथकांमध्ये वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी, परिचारिका, पर्यवेक्षक, प्रशासकीय कर्मचारी यांचा समावेश आहे. ही लस इंजेक्शन स्वरुपात असणार आहे. याशिवाय या लसीला ८ डिग्री सेल्सीयस तापमानात ठेवावे लागणार आहे. त्यामुळे तशा प्रकारच्या रेफ्रीजरेटर्सची व्यवस्था आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, एकाच वेळी दोन लाख लसींचा साठा करता येऊ शकेल, अशीही व्यवस्था आरोग्य विभागाने केली आहे.

बॉक्स

सर्वात आधी लस १५७०० जणांना

कोरोना संसर्गावर प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम जेव्हा चंद्रपूर जिल्ह्यात सुरू होईल, तेव्हा सर्वप्रथम ही लस १५ हजार ७०० लोकांना दिली जाणार आहे. यात वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, परिचारिका व आरोग्य विभागाशी संबंधित फ्रंट लाईनवर काम करणाºयांचा समावेश असणार आहे. त्याचा डेटा जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे.

बॉक्स

केंद्र शासनाकडून मिळणार प्रशिक्षण

कोविडवरील लसीकरणासाठी निवड करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाºयांना केंद्र शासनाकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. लवकरच या प्रशिक्षणाला सुरूवात होणार आहे. ही लस किती तापमानात ठेवायची, लसीची तालुका पातळीवर वाहतूक कशी करायची, लस इंजेक्शन स्वरुपात असल्याने ती मोहिमेत सहभागी कर्मचाºयांना योग्य पध्दतीने कशी देता येईल आदी बाबी या प्रशिक्षणादरम्यान सांगितल्या जाणार आहे.

बॉक्स

ग्रामीण स्तरापर्यंत जाणार लस

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कोराना लसची ग्रामीण स्तरापर्यंत वाहतूक व साठा करण्याबाबत सध्या उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती नुकतीच जाणून घेतली. जिल्ह्यात सध्या एकाचवेळी इतर लसीव्यतिरिक्त कोविडच्या दोन लाख लसींचा साठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यावर त्यांनीही समाधान व्यक्त केले. मात्र ग्रामीण भागापर्यंत विहित तापमान मर्यादेत लस पोहचविण्यासाठी वाहतुक सुविधा अद्यावत करण्याचा प्रयत्न आरोग्य विभाग करीत आहे. तसेच लसीकरण मोहिमेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणीसाठी सुक्ष्म नियोजनही केले जात आहे.