माजी विद्यार्थ्यांनी केला गुरूंचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:34 IST2021-02-05T07:34:14+5:302021-02-05T07:34:14+5:30

माणसाच्या जडणघडणीत व त्याला चांगले संस्कार देण्याचे कुटुंबानंतर दुसरे महत्त्वाचे केंद्र म्हणजे शाळा. शाळेत शिक्षण घेताना सवंगड्यासोबत ...

Alumni felicitated Guru | माजी विद्यार्थ्यांनी केला गुरूंचा सत्कार

माजी विद्यार्थ्यांनी केला गुरूंचा सत्कार

माणसाच्या जडणघडणीत व त्याला चांगले संस्कार देण्याचे कुटुंबानंतर दुसरे महत्त्वाचे केंद्र म्हणजे शाळा. शाळेत शिक्षण घेताना सवंगड्यासोबत घेतलेले चांगले वाईट आठवणी ताज्या करण्यासाठी तसेच ज्या गुरुजनांनी विद्यार्थ्यांना घडविले व त्यांच्याच प्रेरणेने त्यांच्या मार्गदर्शनाने सर्व विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. अशा सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन आपल्या शाळेबद्दल व गुरूजनाबद्दल आदर प्रेम व्यक्त करण्यासाठी माझी विद्यार्थी प्रशांत वसाके यांच्या आयोजनातून

इयत्ता १० वी इंग्रजी माध्यम (वर्ष १९८९) चे सर्व माजी वर्ग मित्रांना,विद्यार्थी यांना तब्बल ३२ वर्षांनी एकत्रित आणून दिनांक ३१ जानेवारीला यांनी ‘नेवजाबाई हितकरिणी उच्च माध्यमिक विद्यालय’, ब्रम्हपुरी येथे भेट दिली. आदरणीय गुरूंचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम घेतला. याप्रसंगी नेही माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य देवानंद राऊत यांच्या हस्ते माजी शिक्षक ऋषी राऊत आणि यु. एम. मराठे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थी यांच्याकडून विद्यालयाला छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देण्यात आली. प्रास्ताविक व संचालन माजी विद्यार्थी सुनील मंगर यांनी केले तर आभार प्रदर्शन माजी विद्यार्थी राजकुमार मस्के यांनी मानले. यावेळी माजी विद्यार्थी प्रशांत वसाके, माजी विद्यार्थी महेंद्र पलसोकर, डॉ सुधीर पुरी, डॉ. प्रशांत पेशट्टीवार, अभिजित चांगोले, कमलेश मोहता, आनंद जाजू, डॉ. महेश पापडकर, डॉ. श्रीकांत नागमोती, अजय राजा उपस्थित होते.

Web Title: Alumni felicitated Guru