शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात तेलंगणातून येणारे सर्व मार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST

जिवती तालुक्यापासून ७० कि.मी.अंतरावर तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात आणि त्या अंतर्गत येणाऱ्या हसणापूर, जैनुर व इतर गावात कोरोनाचे पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहे. रूग्णांच्या संपर्कात आलेल्या क्वारंटाईनच्या संख्येत मोठया प्रमाणात वाढ होत असल्याने तेलंगणातून येणारे संपूर्ण मार्ग बंद करण्यात आले आहे.

ठळक मुद्देतेलंगणात अनेक रुग्ण पाझिटिव्ह : सीमेवरून कोरोना विषाणूची घुसखोरी होऊ नये म्हणून खबरदारी

लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : तालुक्यालगत असलेल्या आदिलाबाद जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. तेलंगणा-महाराष्ट्र सीमा जिवती तालुक्याच्या हाकेच्या अंतरावर आहे. आणि या वादग्रस्त १४ गावात दोन्ही राज्याची विकास यंत्रणा काम करीत असून येथील नागरिकांना तेलंगणा राज्यातून विविध योजनेचा लाभ मिळत असल्याने सर्वाधिक लोक तेलंगणात ये-जा करीत असतात. त्यामुळे तेलंगणा राज्यात झालेली कोरोनाची बाधा सीमेवरील गावात होऊ नये. यासाठी जिवतीचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी तेलंगणातून येणारे सर्व मार्ग बंद केले आहे.त्यानुसार जिवतीचे ठाणेदार विश्वास पुल्लरवार यांनी सीमेवरील लेंडीगुडा, पळसगुडा, इंदिरानगर, कुंभेझरी, येसापूर गावात बाहेरील व्यक्ती गावात प्रवेश करणार नाही व गावातील कुणीही बाहेर जाणार नाही, याची खबरदारी घेण्याचे सांगत सर्व मार्ग बंद करून नागरिकांचे समुपदेशन केले जात आहे. जिवती तालुक्यापासून ७० कि.मी.अंतरावर तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात आणि त्या अंतर्गत येणाऱ्या हसणापूर, जैनुर व इतर गावात कोरोनाचे पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहे. रूग्णांच्या संपर्कात आलेल्या क्वारंटाईनच्या संख्येत मोठया प्रमाणात वाढ होत असल्याने तेलंगणातून येणारे संपूर्ण मार्ग बंद करण्यात आले आहे. यासाठी जिवतीचे ठाणेदार विश्वास पुल्लरवार, पोलीस मित्र गजानन राठोड, तालुका कृषी अधिकारी दमाळे, मंडळ कृषी अधिकारी टी.जी.आडे, कृषी सहाय्यक माधव राठोड, नामदेव राठोड यांनी गावा-गावात जाऊन नागरिकांना सतर्क राहत स्वत:ची व परिवाराची काळजी घेण्यास सांगतले. यावेळी कुभेझरी येथील सरपंच अंबादास जाधव, उपसरपंच लहू गोतावळे, सामाजिक कार्यकर्ते जमालूदिन शेख, कैलास महामुने व गावातील तरूणांनी सहकार्य केले.कोरोना रोखण्यासाठी उपाययोजनाकोरोनाबाधित तेलंगणा राज्यातील गावात नागरिकांचा संपर्क होऊ नये. यासाठी सर्व मार्ग बंद केले. गावातील दारू, खर्रा, सिगारेट आदी बंद करावेत, कामाव्यतिरिक्त कुणीही बाहेर जाणार नाही, तोंडाला माक्स बांधावे व बाहेरून आल्यावर हात साबनाने स्वच्छ धुवावे, कुठेही गर्दी करू नये.हे तेलंगणातून येणारे मार्ग झाले बंदलेंडीगुडा,पळसगुडा, येसापूर, इंदिरानगर, नारायणगुडा, कुंभेझरी, परमडोली, शंकरलोधी, शेडवाही(बा.), येल्लापूर, भेंडवीसह इतर मार्गही बंद करण्यात आले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस