शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा शिक्षक पात्रता परीक्षा

By admin | Updated: October 1, 2014 23:20 IST

प्राथमिक शिक्षक पदाकरिता शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असने आवश्यक असल्याचे शासनाने गतवर्षी जाहीर केले. मागील वर्षी घेण्यात आलेली टीईटी परीक्षा हजारो विद्यार्थ्यांनी दिली होती.

बीएड व डीटीएड विद्यार्थ्यांत निरुत्साह : आॅनलाईन अर्ज सादर करण्याला सुरुवातचंद्रपूर : प्राथमिक शिक्षक पदाकरिता शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असने आवश्यक असल्याचे शासनाने गतवर्षी जाहीर केले. मागील वर्षी घेण्यात आलेली टीईटी परीक्षा हजारो विद्यार्थ्यांनी दिली होती. मात्र, शेकडो डीटीएड व बीएडधारक विद्यार्थी या परीक्षेत अनुत्तीर्ण झाले. नव्याने पदवी घेणाऱ्या व गतवर्षीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्यांसाठी यावर्षी १४ डिसेंबरला दुसऱ्यांदा टीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, यांनी ३० सप्टेंबर रोजी जाहीरात प्रकाशित केली असून, १ आॅक्टोबरपासून आॅनलाईन अर्ज सादर करण्याला सुरुवात झाली आहे. राज्यात दुसऱ्यांदा शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षेसाठी १ ते २२ आॅक्टोबरपर्यंत आॅनलाईन अर्ज सादर करायचे असून २७ आॅक्टोबरपर्यंत चलनाव्दारे बँकेत शुल्क भरुन आॅनलाईन अर्ज ट्रान्झेक्शन आयडीसह अपडेट करायचे आहे. आॅनलाईन अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची प्रत ३० आॅक्टोबरपर्यंत तालुका व जिल्हा अर्ज संकलन केंद्रावर सादर करायचे आहे. जिल्ह्यात शेकडो बीएड व डीटीएडधारक विद्यार्थी आहेत. त्यांना नोकरीची प्रतिक्षा असून शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यास लगेच नोकरी मिळेल, अशी आशाही नाही. गतवर्षीच्या परीक्षेत जिल्ह्यातील १२ हजारच्या जवळपास उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा दिली होती. मात्र, यातील केवळ एक हजारच्या जवळपास उमेदवार उत्तीर्ण झाले होते. अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांवर आक्षेप नोंदविला होता. तर काही जिल्ह्यात टीईटी परीक्षा रद्द करण्याची मागणी झाली. मात्र, राज्य परीक्षा परिषदेने ही परीक्षा घेतली. जे उमेदवार परीक्षा उत्तीर्ण झाले त्यांना शिक्षक पात्रतेचे प्रमाणपत्र मिळाले आहे. मात्र, राज्यात शिक्षक भरतीच होत नसल्याने त्यांच्या जवळील प्रमाणपत्र कुचकामी ठरत आहे. आता दुसऱ्यांदा ही परीक्षा होत असल्याने डीटीएड व बीएडधारक उमेदवारांत परीक्षेविषयी फारसा उत्साह दिसून येत नाही. (स्थानिक प्रतिनिधी)