आरटीई अंतर्गत जिल्ह्यातील ४१३ बालकांचा प्रवेश निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 05:00 AM2020-07-20T05:00:00+5:302020-07-20T05:00:50+5:30

जिल्ह्यातून आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी १९७ शाळा पात्र ठरल्या असून १८०७ प्रवेश क्षमता आहे. या जागांवरील प्रवेशासाठी यंदा एकूण ४ हजार ११४ पालकांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते. यामध्ये १ हजार ७४२ विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले आहेत. यंदा कोरोनामुळे राज्यस्तरावरून प्रवेशांची एकच लॉटरी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे काढण्यात आली. प्रवेशास पात्र ठरलेल्या पालकांच्या मोबाईलर एसएमएस पाठविण्यात आले आहे. मात्र मध्यंतरी कोरोनामुळे प्रवेशप्रक्रिया रखडली होती.

Admission of 413 children in the district has been confirmed under RTE | आरटीई अंतर्गत जिल्ह्यातील ४१३ बालकांचा प्रवेश निश्चित

आरटीई अंतर्गत जिल्ह्यातील ४१३ बालकांचा प्रवेश निश्चित

Next
ठळक मुद्देशिक्षण हक्क कायदा : प्रवेश प्रक्रिया सुरु, १७४२ बालकांची निवड

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शिक्षण हक्क कायद्यातंर्गत आरटीई आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेला शाळास्तरावर २४ जूनपासून सुरूवात झाली. १५ दिवसांत एक हजार ७४२ पैकी आतापर्यंत ४१३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत. तर इतर विद्यार्थ्यांची प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे.
आरटीई प्रवेशासाठी यंदा शाळास्तरावर कागदपत्रे पडताळणी शाळास्तरावर कागदपत्रे पडताळणी केली आहे. त्यानुसार तात्पुरते प्रवेश दिले जात आहे. समितीमार्फत कागदपत्रांची पडताळणीअंती प्रवेश निश्चित केले जात आहे. आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अधिकार मिळावा, यासाठी मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायदा करण्यात आला. या अंतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्क्े जागांवर प्रवेश देण्यात येतो.
जिल्ह्यातून आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी १९७ शाळा पात्र ठरल्या असून १८०७ प्रवेश क्षमता आहे. या जागांवरील प्रवेशासाठी यंदा एकूण ४ हजार ११४ पालकांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते. यामध्ये १ हजार ७४२ विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले आहेत. यंदा कोरोनामुळे राज्यस्तरावरून प्रवेशांची एकच लॉटरी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे काढण्यात आली. प्रवेशास पात्र ठरलेल्या पालकांच्या मोबाईलर एसएमएस पाठविण्यात आले आहे. मात्र मध्यंतरी कोरोनामुळे प्रवेशप्रक्रिया रखडली होती.
त्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात शाळास्तरावर प्रवेशाची कार्यवाही सुरू झाली. याबाबत शिक्षण विभागाकडून प्रवेशास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासंदर्भात तारीख कळविली होती. त्यापैकी ४१३ बालकांचा प्रवेश झाल्याची आकडेवारी आरटीई पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

८७३ जणांना तात्पुरता प्रवेश
अर्ज दाखल केलेल्या पात्र विद्यार्थ्यांपैकी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे काढलेल्या लॉटरीमध्ये सुमारे एक हजार ७४२ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यापैकी ८७३ जणांनी तात्पुरता प्रवेश घेतला आहे. तर ४१३ बालकांचा प्रवेश निश्चित झाला आहे. तात्पुरात प्रवेश झालेल्या बालकांना लवकर निश्चित प्रवेश घेणे गरजेचे आहे.

Web Title: Admission of 413 children in the district has been confirmed under RTE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.