शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

‘मुद्रा’ने दिले ८१.५४ कोटींचे कर्ज

By admin | Updated: September 30, 2016 00:59 IST

सुशिक्षित बेरोजगार युवकांना आपला स्वंयरोजगार सुरु करण्यासोबतच छोट्या मोठ्या व्यवसायीकांना आपल्या व्यवसायात वाढ करता,

६ हजार ७६६ व्यावसायिकांना लाभ : अनेकांनी उभारला हक्काचा व्यवसायचंद्रपूर : सुशिक्षित बेरोजगार युवकांना आपला स्वंयरोजगार सुरु करण्यासोबतच छोट्या मोठ्या व्यवसायीकांना आपल्या व्यवसायात वाढ करता, यावी म्हणून प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. जिल्ह्यात गेल्या काही महिन्यातच तब्बल ६ हजार ७६६ व्यक्तींना कर्ज देण्यात आले असून ही रक्कम ८१ कोटी ५४ लाखांच्या घरात आहे. अनेक होतकरु युवक स्वत:चा रोजगार निर्माण करु इच्छितात. परंतु त्यासाठी आवश्यक भांडवलाची तरतूद होत नसल्याने युवकांचे व्यवसायीक होण्याचे स्वप्न पूर्ण होवू शकत नाही. अशा होतकरु युवकांना सहज कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना सुरु करण्यात आली आहे.सदर योजना तीन स्थरावर राबविली जाते. त्यात शिशुगट योजने अंतर्गत १० ते ५० हजार रुपयापर्यंत कर्ज दिले जाते. किशोरगटात ५० हजार ते ५ लाखांपर्यंत तर तरुण गटात ५ लाख ते १० लाखापर्यंत व्यवसायासाठी कर्ज देण्याची तरतूद आहे. नवीन होतकरु युवकांसोबतच अस्तिवात असलेल्या व्यवसायाच्या वाढीसाठीही योजनेअंतर्गत कर्ज दिल्या जाते.सहकारी, राष्ट्रीयकृत, प्रादेशिक ग्रामीण बँक व बिगर बँक वित्तीय संस्थामार्फत कर्ज दिले जाते. ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना त्यांच्या आवडी किंवा कौशल्याप्रमाणे योजनेअंतर्गत व्यवसाय निवडण्याची मुभा आहे. साधारणपणे ग्रामीण भागात छोटे-मोठे व्यवसाय, दुकान, जोड व्यवसाय तसेच लहान मोठे उद्योग, प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी कर्ज देण्याची तरतूद या योजनेत असून याचा अनेकजण लाभ घेत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)