२४ तासात १३ कोरोनामुक्त, सहा पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:39 IST2021-02-05T07:39:23+5:302021-02-05T07:39:23+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासात १३ जणांनी कोरोनावर मात केल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर सहा ...

13 corona free in 24 hours, six positive | २४ तासात १३ कोरोनामुक्त, सहा पॉझिटिव्ह

२४ तासात १३ कोरोनामुक्त, सहा पॉझिटिव्ह

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासात १३ जणांनी कोरोनावर मात केल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर सहा बाधितांची नव्याने भर पडली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या २३ हजार ८० वर पोहोचली आहे. सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ५६७ झाली आहे. सध्या १२१ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात २ लाख ५८६ नमुन्यांची तपासणी झाली. त्यापैकी १ लाख ७५ हजार ७०५ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ३९२ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३५४, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १५, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. आज बाधित आढळलेल्या सहा रुग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रातील एक, चंद्रपूर तालुक्यातील एक, बल्लारपूर एक, ब्रम्हपुरी दोन व येथील चिमूर एका रुग्णांचा समावेश आहे.

Web Title: 13 corona free in 24 hours, six positive