शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

११५ शेतकरी सावकारी कर्जमुक्त

By admin | Updated: September 7, 2016 00:47 IST

विविध कारणांमुळे शेतकऱ्यांना सावकारांकडून कर्ज घ्यावे लागते. शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेत...

कर्जाची रक्कम सावकारांना अदा : आणखी प्रकरणे कर्ज मुक्तीसाठी सादरचंद्रपूर : विविध कारणांमुळे शेतकऱ्यांना सावकारांकडून कर्ज घ्यावे लागते. शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेत सावकारही त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वादरात कर्ज वसुल करतात. शेतकऱ्यांच्या या जाचातून सुटका करण्यासाठी शासनाने गेल्या वर्षी सावकारी कर्जमुक्ती योजना सुरु केली होती. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ११५ शेतकरी सावकारी कजार्तून मुक्त झाले आहेत.गावगाड्यात अजूनही सावकारांकडून पीक कर्जासाठी पैसे घेतले जातात. यातील बरेच सावकार नोंदणीकृत असतात तर काही जण अनधिकृतपणे सावकारीचा व्यवसाय करीत असतात. या सावकारांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होते. जास्त दरात कर्ज वसुल करण्यासोबतच गहाण वस्तुही सावकारांकडून हडपल्या जातात. सावकाराच्या जाचातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी गेल्या वर्षी सावकारी कर्जमुक्ती योजना राज्य शासनाने सुरु केली होती.या योजनेअंतर्गत नोंदणीकृत सावकारांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करुन सदर कर्ज शासनाच्या वतीने सावकारांना अदा केल्या जाणार होते. त्या अंतर्गत सावकारांकडून कर्ज घेतलेल्या प्रकरणांचा आढावा घेण्याचे काम तालुका व जिल्हा समितीने प्रारंभ केले होते. जिल्ह्यात २४२ परवानाधारक सावकार आहेत. या सावकारांना आपल्याकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची प्रकरणे कर्जमुक्तीसाठी सहकार विभागाच्या तालुकास्तरीय कार्यालयाकडे सादर करावयाची होती. त्याप्रमाणे जिल्ह्यात एकूण ६०८ कर्जमुक्तीची प्रकरणे सादर झाली होती. सदर प्रकरणे सादर झाल्यानंतर तालुका समितीने बैठक घेवून पात्र प्रकरणे जिल्हा समितीसमोर सादर करावयाचे होते. त्यानुसार प्रस्तावाच्या छाननी अंती १५२ प्रकरणे जिल्हास्तरीय समिती समोर कर्ज माफीसाठी ठेवण्यात आली. यातील ११५ प्रकरणे जिल्हा समितीने मंजूर केली आहे. मंजूर प्रकरणातील शेतकऱ्यांनी सावकारांकडून घेतलेले ११ लाख ४१ हजार कर्जाची मुद्दल तसेच १ लाख ९२ हजार रूपयाचे व्याज असे एकूण १३ लाख ३३ हजार रुपये शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जाचे सावकारांना अदा केले आहे. त्यामुळे सदर ११५ शेतकरी पूर्णपणे सावकार कर्जमुक्त झाले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)गहाण वस्तूही परत केलेकर्ज घेताना सावकाराने गहाण म्हणून काही वस्तू ठेवून घेतलेल्या असल्यास त्याही परत करण्याची तरतूद असल्याने अशा वस्तू परत करण्यात आल्या आहेत. आणखी काही प्रकरणे कर्जमाफीसाठी जिल्हा समिती समोर आले असून समितीच्या बैठकीनंतर आणखी काही शेतकरी सावकारी कजार्तून मुक्त होणार आहेत.खरीप कर्जमाफी करण्याची मागणीशासनाने शेतकऱ्यांना सावकारी कर्जातून मुक्त केले असले तरी खरिप पीक लागवडीसाठी विविध बँक, सेवा सहकारी सोसायटी यांच्याकडून घेतलेले कर्ज अनेक शेतकऱ्यांचे थकीत आहे. सावकारी कर्जापेक्षा बँकांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त असून शासनाने कर्जमाफीची घोषणा करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.