शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झालेल्या कुटुंबावर गावकऱ्यांचा जीवनावश्यक वस्तु देण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 10:56 IST

Boycott by villagers : या कुटुंबावर दुहेरी आघात सहन करण्याची वेळ आली आहे. 

ठळक मुद्देएका दिवसाच्या अंतराने दोघांचाही काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला.दोन महिला व दोन मुलांनी बोथा काजी गावातील घरी दु:खात दिवस काढणे सुरू केले. जीवनावश्यक गरजा भागविणाऱ्यांनी त्यांना नकार देण्यास सुरुवात केली.

लोकमत न्यूज नेटवर्क   खामगाव : कुटुंब प्रमुखासह वडिलांचा दोन दिवसांत मृत्यू झाल्याने त्या कुटुंबातील इतर सदस्यांना जीवनावश्यक वस्तू देण्यास व्यावसायिकांकडून टाळाटाळ केली जात असल्याचा प्रकार घडत आहे. संबंधितांनी ही बाब इतर गावांतील नातेवाइकांना कळविल्याने उघडकीस आली आहे.

खामगाव तालुक्यातील बोथा काजी येथे गेल्या काही दिवसांपासून त्या कुटुंबाला अशी वागणूक दिली जात आहे. गावातील ३५ वर्षीय तरुण नोकरीनिमित्त बाहेरगावी होता. प्रकृती बिघडल्याने तो गावात आला. गावात आल्यानंतर कुटुंबातील सेवानिवृत्त वडिलांची प्रकृती बिघडली. दोघांनाही अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान एका दिवसाच्या अंतराने दोघांचाही काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबात असलेल्या दोन महिला व दोन मुलांनी बोथा काजी गावातील घरी दु:खात दिवस काढणे सुरू केले. या काळात त्यांना धीर देण्यासोबतच मदतीचा हात मिळणे आवश्यक असताना त्यांना जीवनावश्यक वस्तू मिळणेही कठीण झाले.  थंड पाण्याचे कॅन, दळण, किराणा तसेच इतरही जीवनावश्यक गरजा भागविणाऱ्यांनी त्यांना नकार देण्यास सुरुवात केली. त्यामुळे हे कुटुंब गावातच कसेबसे दिवस काढत आहे. गावातील या परिस्थितीबाबत त्यांनी नातेवाइकांना माहिती दिली. त्यामुळे काहींनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, जीवनावश्यक गरजा भागविणाऱ्यांना समजावून कोण सांगणार, अशी परिस्थिती निर्माण झाली. विशेष म्हणजे, गावात या कुटुंबासोबतच इतरही दोन कुटुंबांतील सदस्य कोरोना पाॅझिटिव्ह आहेत. त्या कुटुंबांबद्दल जीवनावश्यक पुरवठादारांकडून सहानुभूती दाखवली जात आहे, तर या कुटुंबात दोन मृत्यू झाल्याने त्यांना सुविधा देण्यास नकारघंटा आहे. त्यामुळे या कुटुंबावर दुहेरी आघात सहन करण्याची वेळ आली आहे. 

भीतीने बोलण्यास नकार दरम्यान, या कुटुंबातील संबंधितांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी गावपातळीवरचा विषय आहे.  आज ना उद्या परिस्थिती सुधारेल, या आशेवर बोलण्यास नकार दिला. 

बाहेरगावी असलेल्या आरओ प्लांटकडून त्यांना पाणी देण्यास नकार दिला होता. ही समस्या आपण त्यांच्याशी बोलून सुरळीत केली. उर्वरित जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत त्यांनी माहिती दिल्यास ती समस्याही निकाली काढता येईल. - सोपान तुंबडे, पोलीस पाटील, बोथा काजी.

एकाचवेळी कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांनी धास्ती घेतली होती. त्यानंतर खबरदारीच्या सर्वच उपाययोजना केल्या. कुटुंबाच्या घरात फवारणी केली. तसेच इतरही मदतीसंदर्भात माहिती मिळाल्यास ती ग्रामपंचायत प्रशासनाकडून केली जाईल. -अलका उद्धव म्हस्के, सरपंच, बोथा काजी.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणाSocialसामाजिकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस