मलकापूर, दि. २0- मलकापूर व वडनेर भोलजी परिसरातून गत दोन दिवसात तब्बल तीन तरूणी घरून निघून गेल्या आहेत. यामध्ये एक मात्र नवविवाहिता असून, १५ व १६ मार्च रोजी शहर पोलीस स्टेशनला यासंदर्भात मुलींच्या नातेवाइकांनी मुली हरविल्याची फिर्याद दाखल केली आहे.रूपाली अशोक ऐंडोले (वय २0) रा. वडनेर भोलजी ही तरूणी १५ मार्च रोजी घरून निघून गेली आहे. कविता राजूसिंग राजपूत (वय २२) रा. रेल्वे स्टेशनजवळ मलकापूर तसेच पूजा चेतन पाटील (वय १८) रा.वृंदावन नगर या तरुणी १६ मार्च रोजीपासून घरून निघून गेल्या आहेत. या दोघींमधील पूजा पाटील ही नवविवाहिता असल्याचे समजते.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}