शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात प्रतिदिन तीन कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 10:53 IST

प्रतिदिन सरासरी तीन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत असल्याने जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचा धोका वाढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा धोका अधिक गडद झाला असून गेल्या नऊ दिवसात जिल्ह्यात तब्बल ३२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढलून आले आहेत. प्रतिदिन सरासरी तीन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत असल्याने जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचा धोका वाढला आहे.शहरी आणि ग्रामीण भागात हे संक्रमण दिसत असून आता मलकापूर शहर कोरोना संक्रमाचा हॉटस्पॉट बनले आहे. येथे सात दिवसात १२ कोरोना बाधीत रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने मलकापूर शहरासह ग्रामीण भागात सध्या लक्ष केंद्रीत केले आहे. बुलडाणा जिल्ह्यात ६५ दिवसात ६९ कोरोना बाधीत आढळून आले आहेत. सरासरी प्रतिदिन एक असे जिल्ह्याचे प्रमाण वर्तमान स्थिती वाटत असले तरी गत नऊ दिवसाचा आढावा घेतला असता त्याचा वेग दुपटीने वाढल्याचे चित्र आहे.एकंदरीत ही स्थिती असली तरी कोरोना बाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जिल्ह्यात सुधारले असून ४९ टक्क्यांवरून ते ६१ टक्कयावर गेले आहे. मात्र कोरोना संसर्गाचा जिल्ह्या धोका कायम आहे. मलकापूर शहरातही काही संदिग्ध रुग्ण आढळून येत असून बॅकिंग क्षेत्राशी संबंधित एका व्यक्तीत संसर्गाची लक्षणे आढळून आल्याने संदिग्ध रुग्ण म्हणून त्यास एक जून रोजी बुलडाणा येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले ६१ टक्क्यांवरजिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचेप्रमाण ६१ टक्क्यांवर पोहोचले आहे. आधी ते ४९ टक्के होते. मंगळवारी सकाळी नऊ जणांनी कोरोनावर मात केल्याने जिल्ह्यातील कोरोना मुक्त झालेल्यांचा आकडा हा ३३ वरून ४२ वर पोहोचला आहे. सध्या २४ कोरोना बाधीतांवर शेगाव, खामगाव आणि बुलडाणा येथील कोवीड-१९ रुग्णालयात उपचार करण्यात येत असून रुग्णालयातील सर्व कोरोनाबाधीतांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयीन सुत्रांनी सांगितले. आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वानुसार या रुग्णांना कुठलाही त्रास नसल्यास प्रसंगी त्यांची आयसोलेशन कक्षातून सुटी केल्या जावू शकते. त्यानुषंगाने मंगळवारी नऊ जणांना सुटी देण्यात आल्याने दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या